प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गट ग्रामपंचायत कोलीतमारा द्वितीय पुरस्काराने पुरस्कृत. — उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.

 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

           नागपूर जिल्ह्यातील पारशीवनी तालुक्यातंर्गत अतिदुर्गम आदिवासी बहुल पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरील शेवटचे टोक ग्रामपंचायत कोलीतमारा येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत स्थानिक आदिवासी लाभार्थीचे घरकुल बांधकाम करण्यात आले.

          या करिता ग्रामपंचायत कोलीतमारा येथील सरपंच श्री.कलिरामजी उईके तसेच ग्रामसचिव श्री.सचिन देशमुख,ग्रा.पं.सदस्य,जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण सभापती राजूभाऊ कुसुंबे,पारशिवनी प.स.चे गटविकास आधिकारी श्री.सुभाश जाधव यांनी मोलाचे योगदान दिले.

          त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्य उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या द्वारा ग्रामपंचायत कोलीतमारा येथील सरपंच श्री.कलीरामजी उईके आणि सचिव श्री.सचिन देशमुख यांचा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मानपत्र आणि शिल्ड देऊन सन्मान करण्यात आला.

             तसेच गट विकास अधिकारी श्री.सुभाष जाधव पं.स.पारशीवनी,यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील उत्कृष्ट कार्याबद्द पुरस्कृत करण्यात आले.

            श्री.मनोहरजी जाधव अभियंता (बांधकाम) यांना राज्य पुरुस्कृत योजने अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल प्रथम पुरस्काराने गौरविन्यात आले.