प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
नागपूरातील दंगलीनंतर टोकाचे सामाजिक वैमनस्य निर्माण झाले असल्याचे गंभीर प्रकरण एका विद्यार्थ्याच्या शाळा प्रवेशा वरुन पुढे आले.
नागपूर येथे काही महिन्यांपूर्वी कबरी वरुन दंगल झाली होती.या दंगलीचे पर्यावशन सामाजिक द्वेषामध्ये झाल्याचे दिसून येते आहे.
दंगलीनंतर मुश्लिम विद्यार्थिनिंना नागपूर येथील,”दयानंद आर्य कन्या विद्यालयात,प्रवेश नाकारला गेला आहे.
शाळा प्रवेशाला अनुसरून विद्यार्थांत भेदभाव करणाऱ्या शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भिवंडि पुर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.
महाराष्ट्र सारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात खोल जातीवाद व धर्मवाद रुजला असल्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जात आणि धर्मावरुन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारणे होय…
अशा प्रकार अतिशय गंभीर आणि घातक असून या घटनाक्रमाची वेळीच दखल घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांचे आहे.



