मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर याची,”स्त्रि शक्ती संवाद यात्रा,रामटेक विधानसभा निर्वाचन क्षेत्रापासून प्रारंभ..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी::शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांची,”स्त्री शक्ती संवाद यात्रा, विदर्भातील रामटेक विधानसभा अंतर्गत कन्हान येथून आज शुभारंभ करण्यात आला.

             यावेळी शिवसेना पक्ष जनसंपर्क कन्हान कार्यलयात महिला पदाधिकारी व महिला शिवसैनिकांची बैठक पार पडली.या बैठकीत मार्गदर्शन करताना पेडणेकरताई यांनी उपस्थितीतांसमोर आपल्या भावना  व्यक्त केल्यात.

         त्या म्हणाल्यात आदरणीय बाळासाहेबांनी व उद्धवसाहेबानी सोडून गेलेल्यांना भरभरून दिलं,विश्वास केला,पण काहींना जास्त दिल्यामुळे पचलं नाही.परंतु सच्चा शिवसैनिक आजही मोठ्या संख्येने सोबत आहे.

         पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीत शिवसेना काय आहे ते सर्व दाखवून देतील.यावेळी उपस्थित सर्व महिला भगिनींना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देऊन उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरतेने उभे रहा असे आवाहन केले.

          यावेळी या बैठकीला प्रामुख्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सौ.रंजनाताई नेवाळकर,रामटेक विधानसभा प्रमुख श्री.विशाल बरबटे,पूर्व विदर्भ महिला संघटीका सौ.शिल्पाताई  बोडके,रामटेक लोकसभा महिला संपर्क प्रमुख सौ. मंदाकिनीताई  भावे, लोकसभा सहसंपर्क प्रमुख श्री.उत्तम कापसे महिला जिल्हा प्रमुख सौ. वंदनाताई लोणकर,माजी जिल्हा प्रमुख अलकाताई  दलाल,तालुका प्रमुख श्री.कैलास खंडार इत्यादी  प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. 

             सोबतच याप्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्रातील विधानसभा संघटिका सौ. दुर्गाताई कोचे,रामटेक तालुका महिला प्रमुख सौ.कलाताई तिवारी,तालुका संघटिका सौ.प्रमिला लोखंडे, नगरसेविका सौ.मोनिकाताई पौनीकर,मनसर माजी सरपंच सौ.योगीश्वरी चोखांद्रे,सौ.मोकरकर ताई,सौ.वैशालीताई खंडार,सौ. ललिता शर्मा, सौ.माया नामदिवे, सौ.उषा साखोरे, पुष्पा कारेमोरे,माजी ग्रा.प.सदस्य संगीत पंधराम,रजनी परसमोळे शिल्पा मडावी,सह मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.