कोकडी येथिल विनायक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आता मिळणार आंघोळीसाठी गरम पाणी… — सेमी इंग्रजी माध्यम केला सुरु…

 

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत               

देसाईगंज –

    वि.जा.भ.ज.आश्रम शाळेत दर्जेदार शिक्षणाबरोबरच दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सहाय्यक आयुक्त बहुजन कल्याण डाॕ.सचिन मडावी गडचिरोली यांच्या संकल्पनेतून नुकतेच कोकडी येथिल विनायक प्राथमिक आश्रम शाळेत गॕस गिजर ची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. सोबत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सत्र २०२३-२४ पासून इयत्ता १ली ते ५ वी साठी सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरु करण्यात करुन सोबतच विद्यार्थ्यांना टॕब वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा नुकताच कोकडी येथिल आश्रम शाळेत संपन्न झाला.

        शुभारंभ कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्षा सौ.वनिता कोदंडधारी नाकाडे, माजी पं.स.सभापती परसराम टिकले ,धनंजय नाकाडे माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र बी.नाकाडे , विनायक प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण बी.भागडकर शाळेतील शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते.

            सदर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असे परंतु शाळेने आता गॕस गिजरची व्यवस्था केल्याने कोकडी येथिल विनायक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळणार आहे. सोबत विद्यार्थ्यांना आता सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणार असल्याने सहाय्यक आयुक्त बहुजन कल्याण डॉ.सचिन मडावी गडचिरोली यांनी शाळा प्रशासन, मुख्याध्यापक व संस्थेचे कौतूक केले आहे.

            कार्यक्रमाचे संचालन प्रमोद बी.नाकाडे यांनी तर आभार आर.एम.कापगते यांनी मानले.