ब्रेकिंग न्यूज… — अजितपूर फाट्याजवळ दुचाकीच्या अपघातात सफाई कामगाराचा मृत्यू..‌

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

         खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील दर्यापूर- अमरावती रोडवरील बोराळा ते अजीतपूर फाट्यावर दुचाकीचा अपघात होऊन त्यात दर्यापूर येथील युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि.१६) सायंकाळी ५:१५  वाजताच्या दरम्यान घडली आहे. 

             मृतक दर्यापूर नगरपालिकेत आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत होते.

             विकी सुरेश संगेले (वय.३१) रा. रेल्वे स्टेशन परिसर, दर्यापुर असे दुचाकी अपघातातील मृतकाचे नाव असुन घटनेच्या वेळी मृतक विकी हे दर्यापूर वरून आपल्या मोटरसायकल क्रमांक एम.एच.२८ सी.डी.१२६९  ने अमरावती येथे जात होते. 

          दरम्यान खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील बोराळा लगतच्या अजितपूर फाटा मुख्यवळण रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाला.या अपघातात विकी संगेले यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.

            अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन रुग्णसेवक किरण होले,सचिन शेलारे,शिवा गुल्हांने यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला.

          सदर घटनास्थळी खल्लार पोलिसांनी भेट देऊन अपघाताची नोंद केली आहे.मृतकाच्या पश्चात वयोवृद्ध वडील,पत्नी,मुलगी,व बहीणी असा आप्त परीवार आहे.