व्हॉलीबॉल खेळाचे कौशल्य वृद्धी व गुणवंत खेळाडू मुलांकरीता प्रशिक्षण शिबीर.

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.16: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे आयोजीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे व्हॉलीबॉल खेळाच्या कौशल्य वृद्धी व गुणवंत खेळाडू मुलांकरीता व्हॉलीबॉल या खेळाचे 15 दिवसाचे प्रशिक्षण शिबीराचे आयेाजन पुणे येथे करण्यात येणार असून त्याकरीता खेळाडूची किमान 6 फुट 2 इंच किंवा त्यापेक्षा जास्त उंची असणाऱ्या मुलांना प्रशिक्षण शिबीराकरीता प्रवेश देण्यात येणार आहे. खेळाडूची वयोमर्यादा दि. 01 जानेवारी, 2023 रोजी 16 वर्षाच्या आत असावा. उपरोक्त प्रमाणे उंची व वयोमर्यादा असणाऱ्या मुलांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आपल्या नावाची नोंदणी दि. 17 मे, 2023 रोजी सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे करावी व अधिक माहितीकरीता या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा टिप्पणीत नमुद शारीरीक क्षमतेचे खेळाडूचे नाव या कार्यालयाचे ई-मेल आय.डी. dsogad2@gmai.com वर खेळाडूचे जन्म तारखेचा पुराव्यासह माहिती सादर करावी. जेणे करुन गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू पुणे येथे आयोजीत होणाऱ्या सहभागी होतील असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल हे आवाहन करीत आहे.