क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.16: जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता दि.22/05/2023 ते दि. 10/06/2023 या कालावधीत क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स एरिया, गडचिरोली, क्रीडा प्रबोधिनी, गडचिरोली व जिल्हा स्टेडीयम, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सकाळी 5.30 ते 8.00 व सायंकाळी 5.30 ते 8.00 या कालावधीत शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबीरात 10 वर्षावरील सर्व मुलामुलींना सहभाग घेता येईल.

        उपरोक्त प्रशिक्षण शिबीरात कुस्ती, खो-खो, व्हॉलीबाल, बॉक्सिंग, सिकई मार्शट आर्ट, मैदानी व बॉल बॅडमिंटन या खेळाचे प्रशिक्षण तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून देण्यात येईल. उपरोक्त शिबीरात सहभाग घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. उपरोक्त शिबीरात गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू/विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.