लोकप्रतिनिधी व सर्व सामान्य शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या त्या अभियंता वर कारवाई करा :- शेतकऱ्यांची मागणी 

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

           गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतीला १२तास विज पुरवठा व्हावे यासाठी शासनाने आदेश निर्गमित केले आहे. त्या करिता चंद्रपुर जिल्ह्यातील गांगलवाडी ३३ के व्ही सब स्टेशन येथून आरमोरी देलनवाडी कढोली सब स्टेशन पर्यंत अतिरिक्त वीज वाहीणी टाकण्याचे कार्य युद्ध स्तरावर सुरु आहे.

         या बाबींची चौकशी करण्याच्या हेतुने स्थानिक विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी भेट दिली असता उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता बाभुलकर यांनी आमदार महोदय यांना विज वाहीणीचे काम युद्ध स्तरावर सुरु आहे असे सांगितले. याबाबत आमदार यांनी त्वरित त्या बाबतीची माहिती त्यांचे फेस बुक द्वारे जनतेला दिली.

            यामुळे शेतीला पुरेसी विज उपलब्ध होईल व आपले पेरलेले पिक हाती येईल असे शेतकऱ्यांना वाटले. या बातमीची शहानिशा करण्याकरीता सोनसरी येथील उपसरपंच झुमुकलाल चौधरी यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह प्रत्यक्ष भेट दिली व माहिती घेतली असता वैनगंगा नदी पात्रातून कामास अजिबात सुरुवात झालेली नसल्याने शेतकर्यांचा उत्साहाचा हिरमोड झाला.

         आमदार महोदयांना विज समस्या मार्गी लावण्याकरीता विज वाहीणीचे काम युद्ध स्तरावर सुरु आहे असे भासवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न त्या उपकार्यकारी अभियंताचा फसला असुन लोकप्रतिनिधी व सर्व सामान्य शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या त्या अभियंता वर कारवाई करावी अशी मागणी सोनसरी येथील उपसरपंच झुमुकलाल चौधरी, सचीन दहीकर, दिनेश समर्थ, गणेश शेंडे यांनी केली आहे.