निधन वार्ता… — श्रीमती सुशीला नानासाहेब जगदाळे यांचे दुःखद निधन.

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी 

सराटी तालुका इंदापूर येथील श्रीमती सुशीला नानासाहेब जगदाळे यांचे दुःखद निधन झाले.

          इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला नानासाहेब जगदाळे यांचे गुरुवार (दि. 14 मार्च) रोजी दुपारी निधन झाले.

            निधना समयी त्यांचे वय 92 वर्षाच्या होत्या. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना त्या अन्नदान करत असत. त्यांच्या पश्चात माजी सरपंच भारत जगदाळे, प्रकाश जगदाळे, जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य प्रदिप जगदाळे ही मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा सराटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.