रेल्वे अपघातात इसमाचा मृत्यू.. — तारसा रोड ओव्हर ब्रिज जवळील घटना…

 

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड ओव्हर ब्रिज जवळ रेल्वे अपघातात एका इसमाचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारीने मर्ग अन्वये गुन्हा दाखल केला व अपघात घटनेचा पुढील तपास सुरु केला.

         प्राप्त माहिती नुसार ४ ऑक्टोंबरला फिर्यादी भारत अमरसिंह माक्रो वय ३८ वर्ष रा. ग्राम पंचायत चंदवाही ता.सेहपुरा,जि. डिगडोलो. ह. मु. तारसा रोड ओव्हरब्रिज जवळ कन्हान हे जावई मृतक रमेशसिंग पलकुसिंग कुलस्ते वय ३५ वर्ष रा. ग्राम पंचायत चंदवाही ता.सेहपुरा जि.डिगडोलो, ह.मु. तारसा रोड ओव्हरब्रिज जवळ कन्हान यांचा सह १४ लोकांना घेऊन तारसा ओव्हरब्रिज जवळ रेल्वेचे केबल लाईन टाकण्याकरिता कामाला आले होते. 

          काल सकाळी ७ वाजता दरम्यान भारत अमरसिंह माक्रो काही लोकांना घेऊन परिसरात फिरायला निघाले असता,तारसा रोड ओव्हरब्रिजच्या रेल्वे गेट जवळ जावई मृतक रमेशसिंग पलकुसिंग कुलस्ते यांचा मृतदेह मिळुन आला. 

           सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिल्याने घटनास्थळी पोलीस पोहचले व पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

           कन्हान पोलीसांनी फिर्यादी भारत अमर सिंह माक्रो यांचे तक्रारीने पोस्टे कन्हानला मर्ग क्र. ४७ /२३ कलम १७४ जा.फौ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात स.फौ.खुशाल रामटेके,सम्राट वनपर्ती हे करित आहे.