मारदा येथील आदिवासी बांधवात जनजागृती व सविधानाचे महत्व…  — U c c कोड सर्वासाठी घातक…

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली – तालुक्यातील पोटेगांव सर्कल मधील मारदा गावात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्यआदिवासी बांधवात जनजागृती व संविधानाचे महत्व पटविण्याकरीता बैठक पार पडली. सदर बैठकीचे अध्यक्ष सरपंच मनोहर पोटावी तर मार्गदर्शक म्हणुन रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , बामसेफ चे नेते भोजराज कान्हेकर , ज्ञानेश्वर मुजमकर आदि होते.

          U c c कोड सर्वासाठी घातक ठरणार आहे. यात समान अधिकार , नो रिझर्व्हेशन यात उच्च वर्णीय , मातब्बरांना फायदा होणार आहे. ५ व ६ व्या सुचिमधे पूर्वी वस्तु नेण्याकरीता ग्रामसभेचा ठरावाशिवाय जमत नव्हते आता ठरावाची काही गरज राहणार नाही. वनहक्क कायद्यात मावा नाटे मावा राज होता.

       यापुढे ठेकेदारी पध्तीत जंगलं ठेकेदाराकडे जाईल. व आपणाला काहीही अधिकार राहणार नाही. शाळा श्रीमंतांना विकल्या जातील व बंद पाडून इमारती , जागा श्रीमंतांच्या घसात जाईल एवढे खतरनाक कायदे तयार केल्या जात आहे. हा सरकारचा ठाव हानून पाडावयसाठी आपल्या एकजुटीची ताकद दाखवायची आहे. यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे.

        असे बामसेफ चे भोजराज कान्हेकर यांनी सांगीतले तर प्रा. मुनिश्चर बोरकर म्हणाले की , संविधान बदलविण्याची भाषा करणाऱ्या सरकारचा ठाव हाणून पाडावयाचा आहे. डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिले त्यामुळे आपण जगत आहात. संविधान वाचविण्यासाठी पुन्हा एक लढा करावयाचा आहे. येत्या संविधान दिनी पोटेगाव येथील होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर मुजमकर तर आभार ग्रामसभा जिल्हा संघटक शिवाजी नरोटे यांनी केले. बैठकीला ग्रामसभा अध्यक्ष योगराज कड्यामी , सचिव . विश्वनाथ नरोटे , पोलिस पाटिल केशव कड्यामी , तुळसिराम पोटावी , रमेश नरोटे ‘ हरिदास कड्यामी , संदिप सिडाम , अंताराम पदा ‘ खुशाल पाटावी , जानिराम पदा , प्रमोद कड्यामी , शुकदेव मटयामी , आदि सहीत बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.