तांबोळी आत्तार सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी पत्रकार शौकत तांबोळी यांची निवड….

   बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

       बावडा तालुका इंदापूर येथील तांबोळी आत्तार सामाजिक बहुउद्देशीय संस्था, बावडा गावची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जेष्ठ मौलाना रशिद आत्तार यांच्या अध्यक्षस्थानी सदरची बैठक घेण्यात आली. 

    बावडा (ता. इंदापूर) तांबोळी आतार सामाजिक बहुउद्देशीय संस्थेची स्थापना व नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी रफिक तांबोळी यांच्या बंगल्यावर बैठक संपन्न झाली. यावेळी रियाज भाई तांबोळी यांनी संस्थेची उद्दिष्टे व कार्य विषद करून सांगितले.

     तांबोळी आत्तार सामाजिक बहुउद्देशीय संस्था, बावडा ची नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष – शौकत बाशुलाल तांबोळी (पत्रकार), उपाध्यक्ष – फिरोज मौला आत्तार, खजिनदार – रफिक हाजी महंमद तांबोळी, सचिव – आसिफ रशिद आत्तार, सहसचिव – आसिफ सिकंदर तांबोळी, कार्यकारणी सदस्य – रमजान चाॅद आत्तार, मुजमिर अमिन तांबोळी, जहांगीर रमजान आत्तार, नईम अजिज आत्तार, रहिम अल्लाउद्दीन तांबोळी, रहिम अली तांबोळी तर सल्लागार मंडळ – मुनीर बाळू आत्तार ( ग्रामपंचायत सदस्य), रहिम दस्तगिर अत्तार, ईन्नुस अल्लाउद्दीन तांबोळी यांची एकमताने निवड करण्यात आली.

    निवडी नंतर बोलताना शौकत तांबोळी (पत्रकार) यांनी सांगितले की, समाजातील उपेक्षित, वंचित घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्राधान्याने काम करणार आहे. तसेच मुलांचे शिक्षण, व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. समाजातील मागासलेपणा, आर्थिक दारीद्र्य घालवण्यासाठी शासकीय योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच राजकीय भागीदारी मिळवण्यासाठी सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

    यावेळी सिकंदर तांबोळी, निहाल तांबोळी, अकिल आत्तार, शकिल आत्तार, महंमद आत्तार, शाहिद अत्तार, आमिर अत्तार, सलीम तांबोळी, याकूब आत्तार, लियाकत तांबोळी, रहिम आत्तार, सद्दाम आत्तार, समिद तांबोळी, हुसेन आत्तार, शोहेब आत्तार, सोहेल तांबोळी, सद्दाम फुलारी, मोहंमद कैफ तांबोळी, मुजाहिद तांबोळी, अशरफ तांबोळी, सलीम तांबोळी, अशपाक तांबोळी, गफूर तांबोळी आदिंसह जमात बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.