युवराज डोंगरे/खल्लार
दर्यापूर शहरातील गांधी नगर येथे वास्तव्यास असलेले मृणाल इंगळे यांच्या पत्नी समिक्षा इंगळे यांनी प्राध्यापक होण्याचा मान मिळविला आहे. सन 2023 मध्ये इ.एम.आर.एस ची शिक्षक भरती परीक्षा पास होऊन त्या पात्र ठरल्या आहेत.
केंद्र सरकारच्या इ.एम.आर.एस एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल धूळे मध्ये मराठी या विषया करिता ज्युनियर प्राध्यापकपदी निवड झाली.
राष्ट्रीय जनजातीय अनुसंधान संस्थानच्या नियंत्रनात भारतात 740 शाळा असुन त्यातील एका शाळेत समिक्षा इंगळे यांनी प्राध्यापक होण्याचा मान मिळवत घवघवीत यश संपादित केले.तसेच गांधी नगर मधील सुमित किशोर शेरेकर यांची विद्दूत महावितरण मंडळ मध्ये विद्दूत सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी त्यांच्या घरी जाऊन शाल व बुके देऊन गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अमरावती जिल्हा काँग्रेस चे महासचिव ईश्वरभाऊ बुंदेले दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आतिष शिरभाते,राहुल गावंडे,सुशिल गुरमाडे,अंगद चौखंडे,मृणाल इंगळे आदी उपस्थित होते.



