मिलिंद विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक

           नजिकच्या गौरखेडा (चांदई) येथील मिलिंद विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमित कुमार वानखडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिपक कावरे, वासुदेवराव भांडे ,अमोल बोबडे ,मनीषा गावंडे, पुरणप्रकाश लव्हाळे उपस्थित होते.        

       सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांची समायोजित भाषणे झाली.

      अध्यक्षिय भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य त्यांचे विचार हे जगातल्या प्रत्येक माणसाला प्रेरणादायी असून त्यांच्या चालून सेवा करावी.

 विचार विद्यालयाचे मुख्याध्यापक अमित कुमार वानखेडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी संजय आठवले,आनंद खंडारे,गणेश अंभोरे,मुमताज पठाण उपस्थित होते.