ब्रेकिंग न्युज… चोबिता जिल्हा परिषद शाळा शनिवारी होती बंद.. — चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत चोबीता येथील शाळेत एकही शिक्षक नाही.. — हतरु बीट मधील विस्तार अधिकारी एक वर्षापासून बेपत्ता.

दखल न्युज भारत चिखलदरा तालुका प्रतीनीधी-:अबोदनगो चव्हाण

चिखलदरा-: मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील

बारुगव्हाण केंद्रातील चोबिता जिल्हा परिषद शाळेतील दोन्ही शिक्षक शनिवारी गैरहजर आढळुन आल्याने शाळा बंद होती.

       आमचे प्रतीनीधींनी स्वतः शाळेला भेटी दिली असता,शिक्षकांचा गलथान कारभार व शिक्षकांचा शाळेला दांडी मारणाचा प्रकार उघडकीस आला.गावातील पालक व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष यांना विचारना केली असता हे शिक्षक नेहमीच दांडी मारतात असे वास्तव पुढे आले.

      व्हालीबाँलच्या रोटेशन पध्दतीने दांडी मारतात.तिन दिवस एक शिक्षक तर तीन दिवस दुसरा शिक्षक शाळेत ये जा करत असल्याच्या गंभीर प्रकार गावातील नागरिकांनी कथन केला.दांडी मारणाऱ्या शिक्षकांना आशीर्वाद कुणाचा आहे हा प्रश्न निर्माण होत आहे.

        शिक्षकांच्या शाळेला दांडी मारण्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुसाकसान होत आहे आणि पोषण आहार सुध्दा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले नाही.या शाळेकडे वरिष्ट अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का म्हणून होत आहे?हेच कळायला मार्ग नाही.

       हतरु बिट मधिल विस्तार अधिकारी एका वर्षापासुन दिसले नाही आणि केंद्रप्रमुखाकडे प्रभार कारभार असल्यामुळे ते त्यांची शाळा पाहणार कि प्रभार सांभाळणार? हा मुद्दा लोक चर्चेचा विषय बनला आहे.

         चोबिता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तिन दिवस एक शिक्षक शाळा पाहतो व दुसरा शिक्षक चाटा मारतो आणि नेहमीच प्रकार झाला असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. चोबिता शाळेचे आनलाईनचे काम आहे असे शिक्षक खोटे सांगून शाळेला दांडी मारतात हा प्रकार गंभीर आहे.तद्वतच अशाच प्रकार या भागातील अनेक शाळेवर पहायला मीळत आहे…

        विशेष बाब म्हणजे विस्तार अधिकारी यांनी या भागातील शाळांना एक वर्षांपासून भेटी दिल्या नाही.. ही बाब चिंतेचा विषय आहे.

      चोबीता शाळेतील दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कोणती कार्यवाही होते या बाबी कडे पालक वर्गाचे लक्ष लागले आहे.