नगर परिषद कन्हान मध्ये विकसित भारत संकल्प-यात्रा अंतर्गत योजनांच्या माहितीबाबत शिबिराचे आयोजन.  — नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टनकर यांचे हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन..

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

कन्हान::- नगर परिषद कन्हान-पिपरी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता Information Education Communication Activity (IEC) चे आयोजन करण्यात आले.

        सर्वप्रथम अध्यक्षा सौ. करुणाताई आष्टनकर यांचे हस्ते रिबिन कापून विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन करण्यात आले.

       नगर परिषद कन्हान-पिपरी क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत हेल्थ कॅम्प,पीएम स्वनिधी,प्रधानमंत्री आवास योजना,आयुष्मान भारत कार्ड,दिव्यांग नोंदणी,बांधकाम कामगार नोंदणी,लेक-लाडकी अशा सारख्या विविध योजना बाबत माहिती देण्यात आली व लाभार्थी यांच्या द्वारा संकल्प घेण्यात आले. 

       सदर यात्रेत सुमारे 500 नागरिक उपस्थित असून विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमात शालेय विद्यार्थीनी द्वारे नृत्य सादर करण्यात आले.

           सादर वेळी कन्हान-पिपरी नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टनकर,मुख्याधिकारी श्री. संदीप बोरकर,नगरसेविका कु. रेखाताई टोहणे,सौ.अनिताताई पाटील,सौ.संगीता खोब्रागडे,सौ. सुषमा चोपकर,सौ.वंदनाताई कुरडकर,सौ.वर्षाताई लोंढे,नगरसेवक श्री.राजेंद्रजी शेंदरे,श्री.राजेशजी यादव,शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री.वर्धराजजी पिल्ले,प्रदीप गायकवाड,आशा वर्कर-अंगणवाडी सेविका,डॉ. वैशाली हिंगे प्रा.आरोग्य केंद्र अधिकारी कन्हान आपल्या टीम सह उपस्थित होते.

         शालेय विद्यार्थी शिक्षक सोबतच नगर पालिका कर्मचारी वर्ग श्री.विजयकुमार आत्राम,श्री. फिरोज बिसेन,श्री.नामदेव माने,श्री.हर्षल जगताप,श्री. निरंजन बढेल,श्री.देवीलाल ठाकूर,श्री.रविंद्र धोटे,श्री.आकाश ठमके,कु.प्रांजली सांभारे,श्रीमती मनीषा लाहोरी,श्री.आशीष गुंडूकवार,श्री.नेहाल बढेल,श्री. बंटी खिचर,श्री.अनिल मोगरे,श्री. अरविंद देशमुख,श्री.विठ्ठल खाटीक,श्री.स्वप्नील बेलेकर,श्री. राष्ट्रपाल नितनवरे,श्रीमती अनिता यादव,श्रीमती विजयालक्ष्मी नायडू,श्री.रविंद्र पाहुणे,श्री.शुभम काळबांडे,श्री.शुभम येलमुले,श्री. मयूर डफरे,श्री.आशिक पात्रे,अंकित येलमुले,विपीन वाघमारे व इतर सह कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.