माध्य. व उच्च माध्यमिक विघालयात निरोप समारंभ…

ऋषी सहारे

संपादक

     कोरची पासुन 9 कि.मी.अंतरावर बेतकाठी येथे दिनांक -15 फेब्रुवारी 2024 रोज गुरुवार ला धनंजय स्मृती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेतकाठी येथे आज वर्ग 9 वी व वर्ग 11वी कडुन वर्ग 10वा व वर्ग 12 वा यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य पी. बी. नागपुरे तसेच प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्रा.प्रदिप चापले वनश्री सिनियर कालेज कोरची, सुरज हेमके पारबता बाई विद्यालय कोरची, मिसार कोरची, सौ. कुंतीबाई हुंपुडी सरपंच ग्रामपंचायत बेतकाठी, माजी उपसरपंच सुरेशजी काटेंगे बेतकाठी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तिलकजी सोनवानी, घनश्यामजी मारगाये बेतकाठी, सुरज गुरभेलिया, अरविंद बन्सोड टेकाबेदळ, रघुनाथ बडोले जामणारा, तसेच इतर मान्यवर व पालक वर्ग या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक आर. ए. कापगते , विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे सुरज हेमके , प्रा. प्रदिप चापले , होमराज बिसेन, प्राचार्य पी.बी. नागपुरे या कार्यक्रमाचे आभार प्रा.नुतनकुमार कचलाम तसेच कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.