कोढासावळी येथे आत्मा व डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना अंतर्गत गावपातळीवरील शेतकरी गटाचे प्रशिक्षण संपन्न.‌

      कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

पारशिवनी::-महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने (सेंद्रीय शेती) अंमलबजावणी डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना वर्ष २०२३-२४ अंतर्गत गावपातळीवरील शेतकरी गटाचे प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पारशिवनी तालुक्यातील मौजा- कोंढासावली या गावामध्ये घेण्यात आले.

        शेतकरी गटाचे,नैसर्गिक शेतीवरील शेतकरी प्रशिक्षण राबविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन व नियोजन श्री.प्रमोद सोमकुवर (साहय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, पारशिवानी) यांनी केले.तसेच दसपर्णी, जीवामृत व B.D कंपोष्ट यांचे प्रात्याक्षिक शेतकरी गटा समोर करुन दाखवण्यात आले व माती नमुना काढन्याची पद्धत,जमिनीची मशागत व पोत सुधारणे,सुक्ष्म जिवाणूचा वापर,सेंद्रीय कर्ब वाढवणे इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मनोज नासरे (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन, पारशीवनी) यांनी केले व आपल्या प्रास्तविका मध्ये नैसर्गिक शेतीची संकल्पना, उद्देश कार्यपद्धती,बीजामृत,पिक नियोजन,सापळा पिके,आंतरपीक लागवड,पिक अवशेषांचे कंपोस्ट करणे,माती व पाणी परिक्षणाचे महत्त्व स्वनिर्मित निविष्टा उत्पादन व वापर करने इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

       तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री.गोपी कुंभरे (प्रगतसिल शेतकरी, सुवरधरा) यांनी आपल्या मार्गदर्शन व अनुभवातून शेतक-यांना सेंद्रीय पद्धतीने खर्चाची बचत कशी करावी व जीवामृत,दसपर्णी, निंबोळी अर्क यांचे महत्त्व शेतकरी पटवून दिले. 

      सदर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला भिवसेन पेंच शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्री.राजेंद्र दुनेदार व प्रगतशील शेतकरी श्री.बबन ढोरे,श्री.संजय केरेकर,श्री. गजानन तुपट व ईतर प्रगतसील शेतक-यांचा कार्यक्रमा मध्ये सहभाग होता.

       तसेच श्री.सनी शेंडे (तंत्र सहाय्यक) व श्री.संदीप बेद्ररे(तज्ञ प्रशिक्षक) यांची कार्येक्रम मध्ये महत्वचा सहयोग होता.कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन श्री.रविंद्र सुरमारे (कृषि सहाय्यक, कोंढासावली) यांनी केले व आपल्या आभार प्रदर्शन मध्ये कृषि विभागाचा विवीध योजना ची माहिती देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.