अलंकापुरी नगरीत श्रीमद्वाल्मीकीय रामायण कथेची सांगता…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

      आळंदी : सुवर्णकार समाजाच्या वतीने महाराष्ट्रात व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथमच आचार्य स्वामी श्री सत्यनारायण दासजी यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद्वाल्मीकीय राम कथेचे ५ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते असे जनार्दन पितळे यांनी सांगितले. 

         यावेळी माऊली मंदिरात कीर्तन, प्रवचन, भजन, विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. श्रीमद्वाल्मिकी राम कथा ही आजपर्यंत झालेली नव्हती तेव्हा महाराष्ट्रातील सुवर्णकार समाजाच्या वतीने प्रथमच श्रीमद्वाल्मिकीय राम कथा आयोजन करण्यात आलेले होते या कथेचे सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये कथा करण्यात आली.

           शेवटच्या दिवशी विधीवत होम हवन व २१ ब्राह्मणांच्या मंत्रोपचाराने वैदिक पद्धतीने सुवर्णकार समाजाच्या पाच जोड्या बसवून आहुती देण्यात आली. यावेळी गोविंद महाराज गोरे यांच्या काल्याच्या किर्तनसेवेने या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी गुरुवर्य मारुती महाराज कुऱ्हेकर, डॉ.नारायण महाराज जाधव यांचे आशिर्वाद लाभले. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी कैलास भांबुर्डेकर, राजूशेठ जवळेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.