पाण्यासाठी गेला ईसमाचा बळी !… — एक सुदैवाने बचावला, मिरेगाव येथिल प्रकरण… — ४ दिवसापासून नळ योजना बंद असल्याचा परिणाम…     — अधिकारी, ग्राम पंचायतचे हेतु परसपर दृर्लक्ष….

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

            लाखनी पासून १८ किलो मिटर अंतरावरील तालुक्याच्या शेवटच्या शेवटच्या टोकावर असलेल्या २००० लोकसंख्यैचे मिरेगाव गेल्या आठ दिवसात पाण्याने व्याकुळलेले असून नळ योजना गेल्या ४,२, दिवसापासून बंद असल्याने पाणी आणायला शेतातिल विहीरीवर गेलेल्या ईसमाचा विहीरीवर मांडलेल्या ईलेक्ट्रीक पोल तुटून विहीरीत पडल्याने मृत्यु झाला, तर दुसर्याला पोहता येत असल्याने बचावला. सविस्तर वृत्त असे की, मौजा मिरेगाव पंचायत समिती लाखनी अंतरगत मौजा मिरेगाव येथे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित असून सदर योजनेवर आज पर्यंत करोडो रुपयाचे खर्च झालेले आहे,मात्र ह्या ना त्या कारणाने नेहमीच येथिल जनतेला पिण्याचे पाणी मिळने कठीन झाले असून कधी विद्युत बील न भरल्याने,तर कधी मोटार जळाल्याचा बाहान्याने,तर कधी पाईप फुटल्याने आणी गेल्या दोन दिवसापासून व्हाल खराब झाल्यामुळे मिरेगाव तहानलेला आहे. २ दिवसापुर्वी पाईप फुटल्याने ४ दिवस पाणी पुरवठा बंद होता,आणी लगेच वाल खराब झाल्यामुळे पुन्हा पाणी पुरवठा खंडीत झाल्याने येथिल जनता मिळेल त्या ठिकाना वरून पाणी आणीत आहेत.                   

       आज दिनांक १३/१०/२०२३ रोजी नळाला पाणी न आल्यामुळे येथिल रहिवासी गिरीपाल श्रीपत ऊईके वय वर्ष ४२ आणी शिवसिंग चौव्हान हे अंगणवाडी क्रमांक २ च्या पाठीमागे असलेल्या शेतातिल विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेले,विहीरीला तोंडी नसल्याने सिमेंटचे ईलेक्ट्रीक पोल असलेल्या खांबावर ऊभे राहुन पाणी काढत असतांना अचानक सिंमेंटचा पोल तुटून दोघेही विहीरीत पडले , गिरीपाल यांना पोहता येत नसल्याने व पायाला दोर गुंडाळल्याने खोल विहीरीत बुडाला,तर शिवसिंग चौव्हान यांना पोहता आल्याने त्यांनी आरडाओरडा केल्याने लोक जमा झाले व त्यानी दोराच्या सहाय्याने शिवसिंग चौव्हान यांना विहीरी बाहेर काढले,त्यामूळे त्याचा जिव वाचला. मात्र गिरीपाल याना पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यासाठी जिव गेला.                                                           

            मिरेगांव येथे नेहमीच पाण्याचा प्रश्श्र ऊद्भवत असतांना येथिल अंगणवाडी केंन्द क्रमांक २ ला बोरवेल आणी त्यावर लावलेला सोलर पैनेल सरपंच आणी ग्रामसेवक यांनी कसलीही वरीष्ठाना सूचना न देता सहा महीण्यापुर्वी गाव तलावाच्या पाळीजवळ नेऊन लावली,वास्तविक ती योजना अंगणवाडी केंन्द्र २ साठी होती,आणी मृतक व परीसरातिल जनता त्याच सोलरचा पाणी वापर करीत होते,मात्र अंतरगत राजकारणामुळे कार्यान्वित असलेली योजना सरपंच यांनी दुसरीकडे नेल्यामुळे आणी नळयोजना बंद असल्याने येथिल जनतेला शेतातिल विहीरीवर जाऊन दुषीत असलेले पाणी प्यावे लागते,त्यामुळेच गिरीपाल ऊईके यांच्या मृत्युला ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे जनतेचे म्हणने आहे.                                                            

             सदर कृत्रिम पाणी टंचाई संबधात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा,खंडविकास अधिकारी लाखनी,पाणी पुरवठा विभाग भंडारा यांच्याकडे ६ महीण्यापुर्वी तक्रार वजा विनंती करून सुद्धा अधिकारी आणी येथिल ग्राम पंचायतचे सचिव यांनी दखल घेतली नाही,त्यांनी वेळीच दखल घेतली असती तर,गिरीपाल यांचा जीव पाण्यासाठी गेला नसता ,त्या मुळे त्यांच्यावर कार्यवाही करून सदोष मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकरी जनतेनी केली आहे.