दखल न्यूज भारतचे संपादक रुषीजी सहारे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने….. — एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व तद्वतच कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ, सहनशील मनोधर्याचे धनी….

प्रितम जनबंधु

    संपादक 

              आपल्या कर्तव्यदक्ष जबाबदारीवर ठाम राहुन अनेक शिखरे पादाक्रांत करणारे, पत्रकारितेतील दांडगा अनुभव जोपासत निर्भीड कार्यप्रणालीतुन आपली छाप पाडणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व तद्वतच शातीप्रिय कृतीशील मनोधर्याचे धनी तद्वतच एक पत्रकार ते संपादक असा पत्रकारितेतील खडतर प्रवास पार करुन आपली प्रगत ओळख निर्माण करणारे दखल न्यूज भारतचे संपादक आ. रुषीजी सहारे याचा आज वाढदिवस..!

                 संपादक रुषिजी सहारे याचा जन्म आरमोरी तालुक्याच्या ठिकाणाहून १० किमी अंतरावर असलेल्या सालमारा सारख्या जेमतेम लोकवस्ती असलेल्या खेडे भागात झाला. ग्रामीण भागातील वातावरणात जन्म होऊनही त्यानी बाहेर पडुन उच्च विद्या संपादक केली. एका शेतकरी कुटुंबात जन्म, घरची परिस्थिती हलाखीची असली तरी अनेक खडतर प्रवास पार करुन सहारे सर यांनी कर्तव्यदक्ष, सहनशील व खंबीर नेतृत्व साकारत आड येणाऱ्या अनेक खडतर परिस्थितीवर मात करुन अनेक यशाचे शिखर प्राप्त केले आहेत.

              एवढ्यावरच न थांबता २०२१ मध्ये पत्रकारिता क्षेत्रातील तीन वर्षीय अभ्यासक्रम असलेल्या परीक्षेत (MCJ ) विद्यापीठातून प्रथम येण्याचा मानही त्यानी मिळविला आहे. पत्रकारिता क्षेत्रात आपलाच ठसा उमटवला नाही तर निस्वार्थ भावनेचा अंगीकार करुन अनेकांना पत्रकारिता क्षेत्रात आनुन पत्रकारितेतील न्यूनगंड कसे जोपासले जावे, पत्रकारितेला काय अभिप्रेत आहे याची शिकवण त्यानी अनेकांना दिली व पत्रकार घडवले त्यासोबतच पत्रकार कसा असावा यासाठी संपादक सहारे सर याची प्रेरणा उल्लेखनीय ठरावी असिच आहे. 

                भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र नागाच्या नागभुमीत (नागपुर) या ठिकाणी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. या अभूतपूर्व सुवर्ण सोहळ्याचा दिवस म्हणजेच तमाम भारतीयाच्या इतिहासातील पर्वणी ठरावा असाच आहे. धम्मचक्र परिवर्तन या ऐतिहासिक दिनी सहारे सर याचा जन्म असणे हा योगायोग जरी असला तरी सहारे सर याचा जन्मदिवस याच दिवशी असने म्हणजेच सहारे सर याच्या जीवन प्रवासातील एकप्रकारचा भाग्यदिवसच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणारं नाही. जन्मापासूनच भाग्य घेऊन आलेले सहारे सर याना अवघ्याच काही दिवसात अनेक भाग्योदय प्राप्त झाले आहेत शिवाय त्यानी आपल्या निस्वार्थी, निर्भीड, कार्य कर्तृत्वाच्या जोरावर अनेक पारितोषिक मिळवित अभूतपूर्व यश संपादन केले आहेत.

                पत्रकारिता करित असतांना त्याच्या बातम्यांमुळे सहारे सर अगदीच कुणालाही खटकतात, अनेकांच्या मनात खुपतात त्यामुळेच त्याचेविषयी काहीच्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत. अनेकानी प्रसंग साधून त्याचा खच्चीकरण करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला आहे पण ते डगमगले नाहीत तर अनवरत मार्गक्रमण करीत राहीले. सहारे सरांनी आपला मनोधैर्य खचु दिला नाही याउलट आपली प्रगत कार्यप्रणाली व कर्तबगार जबाबदारी सांभाळत अनेकांच्या ह्रदयात जागा मिळवली आहे. असा सोज्वळ व्यक्तिमत्त्व प्रदर्शित करणारा अफलातून पत्रकार म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

                संपादक सहारे सर याची एकंदरीत कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरावी असीच आहे. सालमारा सारख्या एका छोट्याश्या खेड्यात शेतकरी व सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही अनेक संकटावर मात करुन खंबीर नेतृत्व जोपासत पत्रकारिता क्षेत्रात सहारे सर यांनी आपली छबी निर्माण केली आहे आणी आज दखल न्यूज भारतचे संपादक या पदावर कार्यरत राहुन राज्यपातळीवरील महत्वाची जबाबदारी तत्परतेने पार पाडताना दिसुन येत आहेत. त्याच्या या समाजहितोपयोगी मौलिक कार्याला तद्वतच खंबीर नेतृत्वाला वाढदिवसाच्या निमित्यानं भरभरुन शुभेच्छा प्रदान करतो आहे.

                 सहारे सर यांचा मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत, अगदीच विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांशीही अगदी जिवलगपने मैत्रीचा हात पुढे करुन ऋणानुबंधाचे एकनिष्ठ नाते जोपासणारे, आपल्या सहकारी मीत्राविषयी संपादक सहारे सर याच्या वैचारिक मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील, पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं, ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले संपादक…! काही माणसं स्वभावाने कशीही का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात, अशा माणसांपैकीच एक म्हणजेच सहारे सर !

                संपादक सहारे सर याचे आयुष्य असेच सदोदित फुलत राहो, त्याची वाटचाल सुजलाम् सुफलाम् होवुन अविरत प्रफुल्लित होत राहो, त्याची अनवरत भरभराट होवो. त्याना असेच घवघवीत यश मिळत राहोत अशी दखल न्युज भारतचे संपादकीय संचालक मंडळ तथा दखल न्यूज परीवाराकडुन मंगलमय मनोकामना…!  

” शिखरे उत्कर्षाची सर तूम्ही करीत रहावी, 

कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी, 

तुम्हा दिर्घ आयुष्य लाभो ही मनस्वी सदिच्छा…

     आ. गुरुवर्य आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा!