नवजीवन सीबीएसई मध्ये नंदीबैल सजावट स्पर्धा…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी ऋग्वेद येवले

       नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे नंदीबैल सजावट व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यासाठी वर्ग १ ते ५ करीता नंदीबैल सजावट स्पर्धेचे व वर्ग ६ ते १० करीता चित्रकला स्पर्धेचे आयोजन प्राचार्य  मुज्जमिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरीष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान व सतिश गोटेफोडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. नंदीबैल सजावट स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून सौ. छबू समरित, अवंती डोमळे व सौ. वनिता पटेल उपस्थित होत्या.

          विद्यार्थ्यांनी केलेली अतिशय सुंदर अशी सजावट बघून परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतूक व प्रसंशा तर केलीच पण गुणानुक्रमे कुणास अव्वल स्थान द्यावे यासाठी परीक्षक संभ्रमात पडल्या होत्या. वर्ग ६ ते १० करीता बैल पोळा व ताना पोळा उत्सव या विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेकरीता वर्ग 6 ते 8 च्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

         या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता स्पर्धेचे आयोजक, नवजीवन सीबीएसईचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे सहकार्य केले.