नेहा राचरलावारने ब्लॅक बेल्ट चॅम्पियनशिप जिंकली… — राष्ट्रीय कुंग फू आणि कराटे स्पर्धा 2023…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

                 प्रथम राष्ट्रीय कुंग फू आणि कराटे चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन रविवार 11 जून ला अयप्पा टेंपल हॉल चंद्रपूर येथे करण्यात आले. स्पोर्ट्स शोतोकन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया चंद्रपूर शाखेच्या तीन खेळाडूंनी वय आणि वजन गटात चांगली कामगिरी करून पदक जिंकले. नेहा राचरलावारने चैंपियन ऑफ चैंपियन ब्लॅक बेल्ट स्पर्धेत सुवर्णपदक, तपस्या मेश्राम हिने 25 ते 30 किलो वजनी गटात सुवर्णपदक, कौशल बिरांची हिने 50 ते 55 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावले. या विजयाचे श्रेय खेळाडूंनी त्यांचे पालक व मुख्य प्रशिक्षक विनय पावुराला व उपप्रशिक्षक लोकेश बागवा यांना दिले. चंद्रपूरचे मुख्य प्रशिक्षक सेन्सी विनय पावुराला यांनी स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंना मार्गदर्शन केले.