माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून गावळे कुटुंबाला उपचारा साठी आर्थिक मदत…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी तालुक्यातील मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुर्जा येथील – डोबी विज्या गावडे यांना काही दिवसा अगोदर मूत्र पिडाचा त्रास चालू होता लक्ष न दिल्यामुळे आज त्रास जास्त झाल्याने उपचारा साठी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे आणले असता त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले परंतु घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण होत होती.डोबी विज्या गावळे यांच्या प्रकृतीची माहिती गुर्जा येथील आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकाऱ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती दिली,माहिती मिळताच त्यांच्या वडिल नामे विज्या गावळे यांना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात बोलावून रुग्णालयात उपचार करण्याकरिता आर्थिक मदत केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,नागेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य तथा अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेत,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,रमेश डोके,पलो पाटाळी,लचु गावळे,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.