झाडावरील सरडा जसा रंग बदलतो त्या पद्धतीने काही लोक रंग बदलतात परंतु देवावर जशी भक्ती आसते तशी पवार साहेब यांच्यावर लोकांचा विश्वास व प्रेम आहे :- शर्मिला पवार… — शर्मिला पवार यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सर्वच कार्यकर्त्यांची उपस्थिती.

  बाळासाहेब सुतार

 निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ शर्मिला पवार यांची घोंगडी बैठक व प्रचार सभा संपन्न झाली. ‌

           इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट बारामती लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीच्या उमेदवार संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी पिंपरी बुद्रुक येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या प्रांगणात शर्मिला पवार यांची जाहीर सभा संपन्न झाली. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारे या सभेसाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर आशाच सर्व ठिकाणी सभा संपन्न झाल्या.

          यावेळी शर्मिला पवार बोलत आसताना म्हणाल्या की. पिंपरी बुद्रुक येथे आल्यानंतर मला एक समाधान वाटत आहे की कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडकेदादाची आठवण येते त्यांचे प्रेम पवार साहेबानवर होते आसेच प्रेम आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर पिंपरी बुद्रुक गावातील ग्रामस्थांचे आहे. ताईंच्या माध्यमातून आनेक निधी आपल्या गावासाठी दिलेला आसुन आनेक विकास कामे केलेली आहेत. येथून पुढच्याही काळामध्ये जास्तीत जास्त निधी देऊन ताई गावचा विकास करतील याबद्दल काही शंकाच नाही.

          म्हणूनच संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना बारामती लोकसभेतून उमेदवारी मिळालेली आसून 7 मे रोजी लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांना भरगोच्च मतांनी निवडून द्यावे. 

           झाडावरील सरडा जसा रंग बदलतो त्या पद्धतीने लोक काही रंग बदलतात प्रामाणिक आणि विश्वासू आसंख्य कार्यकर्ते पवार साहेबांच्या बरोबर आहेत. लोकांचे प्रेमही तेवढेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत सर्वच मित्र पक्ष आहेत त्या सर्वांचा विचार एक झालेला असून आपला मतदार संघ हा बारामती आहे हाच आपला अभिमान शर्मिला पवार यांनी पिंपरी बुद्रुक येथे आपले विचार व्यक्त केले.

          या घोंगडी बैठक व प्रचार सभे निमित्त तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, ज्येष्ठ नेते व पंचायत समितीचे माजी सदस्य आशोक घोगरे,सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष सागरबाबा मिसाळ, समाधान बोडके, यांनी ही या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले.

          सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यातचे माजी संचालीका सुभद्रा बोडके व कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा यांचे राष्ट्रवादी प्रेमी जुने सहकारी यांची देखील उपस्थिती होते. या सोबतच पिंपरी बुद्रुक गावातील शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.