जि.प. गांधी विज्ञान महाविद्यालयात निरोप समारंभ…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

  लाखनी :- येथील पी एम श्री जि प गांधी विज्ञान मध्ये वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

      मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनो आपल्या मनात जिद्द, परिश्रम,आत्मविश्वास, चिकाटी, चिंतन, मनन, सातत्यपूर्ण नियोजन, अध्ययन, ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत असणारे विद्यार्थी तयार व्हायला हवे.परीक्षेत उत्तीर्ण होणे हा तर अविभाज्य अंग आहे,त्याहीपेक्षा जीवनात आनंद ,दुःख झाले, यश आणि अपयश आले तर ते न डगमगता पचविण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे असे मुख्याध्यापक रवी मेश्राम यांनी केले.

         जीवन हे यश,अपयश यांचे माहेरघर आहे. लोभ, मद,मोह,मत्सर, यांच्याकडे दुर्लक्ष करून जीवनात सकारात्मक विचार करावा.आई वडील गुरुजनांचा सन्मान करावे. अहंकारी बनू नये, जीवनात आनंदाणे शिस्त अंगीकार करावे, आपले हित अहित कशात आहे याची जाणीव झाली की मान, अपमानाची पर्वा न करता परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे ,व यश संपादन करण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे असे प्रतिपादन प्रा.रेवाराम खोब्रागडे यांनी केले.

           या प्रसंगी उपस्थित प्रा. के.एम. वैद्य , रजत गायधने, मेघा बावणे, प्रधान , गिर्हेपुंजे, मनीषा मदनकर, मोहन फुंडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चणीका नागलवाडे आभार वेदिका सार्वे यांनी केले. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.