मराठा आरक्षणासाठी आळंदी बंदला उस्फूर्त प्रतिसाद…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले देवाच्या आळंदीत बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

              मराठा आरक्षणासाठी काढण्यात राज्य शासनाने तर्फे काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे. या मागणी सोबत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे बुधवार, दि.14 आजपासून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला आळंदी शहरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण शहर शंभर टक्के कडकडीत बंद ठेवण्यात आळंदी येथील सकल मराठा समाजाला पाठींबा दिल्याचे दिसून येत आहे. शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता महाराष्ट्र बंद मधून मेडिकल, हॉस्पिटल यासह इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. 

           यावेळी आळंदी शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली तसेच भैरवनाथ मंदिर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला नागरिक बसले होते. भैरवनाथ चौकात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.