विज्ञान ऑलिम्पिऑड परीक्षेत नवजीवनचे यश…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

साकोली :- नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) जमनापुर / साकोली येथे विज्ञान ऑलिम्पिऑड परीक्षेचे पदक व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

        बक्षिस वितरणाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुजम्मिल सय्यद, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर व वरीष्ठ शिक्षिका भारती व्यास उपस्थित होते.

         विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने नवजीवन सीबीएसई मध्ये प्राचार्य सय्यद सरांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पिऑड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान ऑलिम्पिऑड परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या २१ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकांचे वितरण करण्यात आले.

          या बक्षिस वितरण सोहळ्याप्रसंगी प्राचार्य मुजम्मिल सय्यद यांनी पदक व प्रमाणपत्र वितरण करून सर्व विद्यार्थ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय प्राचार्य, पर्यवेक्षिका व समस्त शिक्षकगण यांना दिले.

           सुवर्ण पदकाचे मानकरी ठरणारे विद्यार्थी यक्षित बोपचे, काव्या कोचे, स्माही पर्वते, कांव्याश कापगते, आस्था लांजेवार, भाविका दाते, दिव्या वाढई, यथार्थ बोपचे, दिशा मल्लानी, अनुश्री चांदेवार, आयुष बिस्वास, कुशल रहेले, अवनी गणविर, आयुष राउत, विक्रम चौधरी, यश खंडारे, रिदधेश हटवार, सानिका मेंढे, तनिष्क भावे, रिदधेश गहाणे व अपुर्वा कापगते होते. कार्यक्रमाचे संचालन ज्योती डोगरवार तर आभार वंदना घोडीचोर यांनी मानले.

           विद्यार्थ्यांच्या सुवर्ण यशासाठी सतिश गोटेफोडे, जयंत खोब्रागडे, अजय बाळबुद्धे, किशोर बावनकुळे, विन्नुष नेवारे, श्रीधर खराबे, अशोक मीना, विजय परशुरामकर, जोशिराम बिसेन, प्रंशात वालदे, सरताज साखरे, सुनिता बडोले, विशाखा पशिने, दिपा येले, पुण्यप्रभा उपासे, प्रतिमा डोंगरे, स्वेजल टेंभुर्णे, माधुरी हलमारे, ज्योती डोंगरवार, लिलेश्वरी पारधी, वैशाली राउत, रेखा हातझाडे, प्रांजली गजभिये, स्मिता मस्के, माधवी बन्सोड, अनिता धुर्वे, मेघा संग्रामे, प्रगती हुमने तसेच विद्यार्थी इतर शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.