एकाच मातेने दिला चार मुलांना जन्म… — धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील घटना..

 

अबोदनगो चव्हाण

दखल न्युज भारत

चिखलदरा तालुका

प्रतिनिधी

 

चिखलदरा

धारणी तालुक्यातील दूनी येथील पपीता बलवंत उईके या 24 वर्षीय महिलेने एकाच वेळी चार मुलींना जन्म दिले असून ही तालुक्यातील पहिलीच घटना बोलल्याचे जात आहे, चार ही बाळ हे सुखरूप असून माताही सुखरूप आहे , त्यामुळे या घटने मुळे धारणी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचऱ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

       सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील दुनी गावातील पपिता बळवंत उईके या महिलेला आज सकाळी 9.30 वा दरम्यान धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसव पीडा दरम्यान दाखल करण्यात आले.

       त्यावेळी या महीले बद्दल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना या महिलेच्या गर्भा विषयी जास्त माहिती नव्हती.रुग्णालयात दाखल झाल्या वेळाच डॉक्टरांना महिलेला पाहून अंदाज लागला की गर्भात एक पेक्षा जास्त बाळ असू शकतात. कारण या महिलेने कोणत्याच प्रकाची सोनोग्राफी केलेली नव्हती त्यामुळे साधारणत गर्भात एक किंवा जुळे बाळ असू शकतात असा अंदाज स्त्री रोग तज्ञ डॉ प्रीती शेंद्रे यांना होता परंतु प्रथम बाळाची प्रसूती झाल्या नंतर एका पाठो पाठ तीन बालकांची प्रसूती झाली व तेही अगदी नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात ही माहिती वाऱ्या सारखी पसरली व सगळी कडे आनंदचे वातावरण निर्माण झाले.

       चार ही बाळ मुली असून सुखरूप आहे माता ही सुखरूप आहे , चार ही बालकांचा वजन अनुक्रमे 1 किलो ग्रॅम , 1 किलो 100ग्रॅम , 1किलो 200ग्रॅम , 1 किलो 300 ग्रॅम आहे , उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग विशेषसज्ञ डॉ प्रीती शेंद्रे यांच्या व परिचारिका तेजस्वी नी गोरे , नंदा शिरसाट यांच्या चमूने अत्यंत अवघड व गुंतागुंतीची प्रसूती नॉर्मल केल्याने यांचे धारणी शहरांमधून अभिनंदन केल्या जात आहे. तर चार ही बाळांचे वजन कमी असल्याने त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार साठी डॉ. जावरकर व डॉ अश्विन पवार यांच्या मार्गदर्शनात ठेवण्यात आले आहे.

      आज सकाळी आमच्या उपजिल्हा रुग्णालयात दुनी येथील एक माता प्रसवपीडा वेळी आली , प्रसव पीडा दरम्यान त्यांना चार बाळ झाले , ही डिलिव्हरी अत्यंत अवघड व कठीण होती पण आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले महिलेची सुखरूप व नॉर्मल डीलव्हरी करून घेतली बाळ व महिला सुखरूप आहे.

      डॉ प्रीती शिंदे 

        स्त्री रोग तज्ञ

    उपजिल्हा रुग्णालय