खल्लार हायस्कुल मधिल विद्यार्थ्यांना पोलिसांमार्फत मोबाइल व सायबर क्राइमबद्दल मार्गदर्शन…

 

युवराज डोंगरे/खल्लार

   उपसंपादक

       खल्लार हायस्कूल खल्लार मध्ये महाराष्ट्र शासन पोलिस विभाग व पोलिस स्टेशन खल्लारमार्फत विद्यार्थ्यांना व्हॅन एलसीडी प्रोजेक्टर द्वारे मोबाईल व सायबर क्राईम याद्वारे आज-काल गुन्हे कसे घडत आहेत याविषयी चित्रफिती द्वारे सविस्तर विद्यार्थ्यांना माहिती प्राप्त झाली सायबर क्राईम होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी.

        मोबाईलचा वापर काळजीपूर्वक कसा करावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही व आपण लुबाडल्या जाणार नाही अशी ज्ञानवर्धक माहिती एल एलसीडी प्रोजेक्टर द्वारे दाखवण्यात आली विद्यार्थ्यांनी या प्रसंगी काही प्रश्न उपस्थित केले असता पोलीस अधिकाऱ्याद्वारे त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.

      याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डी आर नवरे ज्येष्ठ शिक्षक एस डी कडू सर शारीरिक शिक्षक अमोल मोपारी अनिलड बागडे सर यु डी राणे तसेच इतर शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते. पोलिस प्रशासनाच्या व पोलिस स्टेशन खल्लारच्या या स्तुत्य उपक्रमाचे मुख्याध्यापक डी आर नवरे द्वारे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.