वैरागड येथील सर्पमित्रांनी दिला अवाढव्य अजगर सापाला जीवनदान.  – नागरिकांच्या मदतीने सापाला सुरक्षित पकडण्यात आले. – सर्पमित्रांनी वनविभाग कार्यालयास माहिती देऊन सापाला वन आधिवसात सोडले. – सर्पमित्रांना संरक्षक किट देऊन मानधन सुरू करण्याची वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी यांची मागणी.

 

 

प्रतिनिधी/प्रलय सहारे 

 

वैरागड : – आठ फूट लांब जवळपास बारा ते पंधरा किलो वजनाचा असलेला अवाढव्य अजगर सापाला सुरक्षित पकडून वैरागड सर्पमित्रांनी जीवनदान दिल्याची घटना आज दि. १३ एप्रिल रोजी सकाळी घडली. 

      वैरागड येथून चार किलो मिटर अंतरावर असलेल्या करपडा गावाजवळ असलेल्या शेखर यादव लांजेवार यांच्या शेतात मोठा साप असल्याची माहिती संगणक चालक राजू कांबळे यांनी मोबाईल वरून वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षक संस्था आरमोरी सदस्य तसेच सर्पमित्र प्रलय सहारे यांना दिली माहिती मिळताच तत्काळ सर्पमित्र प्रलय सहारे हे सोबत प्रवज्जा प्रलय सहारे हिला सोबत घेऊन त्यास्थळी गेले असता मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव होता. मुख्य रस्त्याच्या बाजूला मोठ्या झाडाखाली पाला-पाचोळ्यात अजगर साप असल्याचे आढळले. साप अवाढव्य असल्याने पत्रकार रामदास डोंगरवार, लोमेश वाकडे, आकाश रणदिवे, ज्ञानेश्वर शेंडे, खुशाल ठाकूर, संतोष लांजेवार यांच्या मदतीने त्या सापाला अलगत शेताच्या बांदित आणून सुरक्षित पकडण्यात आले आणि त्यानंतर वन विभाग कार्यालयात सापाची नोंद करून सर्पमित्र प्रलय सहारे आणि संजय उर्फ कादर बांबोळे यांनी वन अधिवासात सोडले.

      वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी वन्यजीवांना संरक्षण देण्याचे कार्य करीत असते. कार्य करीत असताना अनेक विषारी जीवांचा सामना करावा लागत असते. यातच स्वतःचा जिवसुद्धा गमवावा लागतो यासाठी शासन आणि वनविभागाने सर्पमित्रांना संरक्षक किट देऊन मानधन सुरू करण्याची मागणी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे.