अखिल प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळा सोबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांची आंदोलनातील मुद्यावर चर्चा..

युवराज डोंगरे/खल्लार

           उपसंपादक 

       अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा अमरावतीने दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ केलेल्या धरणे आंदोलनाचे फलित म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा व शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने,उपशिक्षणाधिकारी मोहने, श्रीमती गजाला उप वित्त व लेखाधिकारी मारणे व शिक्षणाधिकारी कार्यालयातील कक्ष अधिकारी,सबंधित लिपीक यांच्या समक्ष शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.

         प्रामुख्याने पदोन्नती प्रश्नाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित कार्यवाही निर्देश दिले.विस्तार अधिकारी शिक्षण प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण करण्यात केंद्रप्रमुख उच्च मुख्याध्यापक या पदोन्नतीला सुद्धा गती देण्यात येऊन आचारसंहिते पूर्वी सदर पदोन्नत्या पूर्ण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेत.

          तसेच निवड श्रेणी व मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेले वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत लवकरच प्रस्ताव तयार करून प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

          सुटी काळातील रजेचा पगार काढण्याबाबत तसेच धारणी व चिखलदरा पंचायत समितीतून बदली आलेल्या शिक्षकांच्या सेवा पुस्तिका संबंधित पंचायत समितीला पाठविण्याबाबत,सेवानिवृत्त शिक्षकांच्या अंशदान उपदान,भविष्य निर्वाह निधी गट विमा प्रस्तावा बाबत,सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या पेन्शन केस गतीने तयार करण्याबाबत,भविष्य निर्वाह निधीच्या सन २०१९-२०,व २०२०-२१ च्या स्लिप ताबडतोब पुढील दोन वर्षाच्या स्लिप पंधरा दिवसात देण्याचे वित्त विभागाने मान्य केले.

           2005 पुर्वी जाहिरात निघालेल्या सर्व शिक्षकांचा शासन निणर्या नुसार जुन्या पेंशन योजनेत सहभागी करून घेणे.धारणी व चिखलदरा पं.स.मधील प्रलंबीत रजा प्रकरणे लक्ष देवून निकाली काढण्यासाठी संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांना सांगण्यात येईल असे सांगितले.

       वर्ष पूर्ण झाले असल्याने वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव तातडीने निकाली काढणे.या सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली चर्चेमध्ये राज्य संघाचे उपाध्यक्ष किरण पाटील,जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी,जिल्हा सरचिटणीस सुभाष सहारे,जिल्हा कार्याध्यक्ष संजय साखरे,निळकंठराव यावले,महिला आघाडी प्रमुख सुनिता पाटील,पांडुरंग भगेवार,ओंकार राउत चर्चेदरम्यान उपस्थित होते,असे डी.आर.जामनिक सरचिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.