आमदार व खासदार यांना पडला मतदार संघातील विकास कामाचा विसर.. — उपोषणकर्त्यांचा आरोप..

  युवराज डोंगरे

 उपसंपादक खल्लार

        दर्यापूर ते दहीहांडा हा मुख्य रस्ता असून अत्यंत दुर्घटनाग्रस्त आहे.आजच्या स्थितीत मतदार संघातील लोकप्रतिनिधी यांना आज त्यांच्या कार्यकाल पूर्णत्वाच्या मार्गावर असून सुद्धा दर्यापूर ते दहीहांडा हा रस्ता करायचे नाही असे दिसून येत आहे का? 

          हा रस्ता अंदाजे २० ते २२ किमीचा असून या रस्त्याने पायी जाणे सुद्धा आज सामान्य नागरिकांना महाग पडत आहे.तसेच या भागातील ग्रामस्थांना मरण यातना सहन करावे लागत आहे,ही खूप मोठी शोकांतिका आहे.

        राज्य सरकार व केंद्र सरकार आयाराम यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे अशी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे.यांना महाराष्ट्रातील विकास कामे सोडून पक्ष फोडण्यात राज्य सरकार मग्न असल्याचे दिसून येत आहे. 

        येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या नागरिकाला मतदान करावे कोणाला सामान्य नागरिकाला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे.

            आज (१३) उपोषणाचा दुसरा दिवस असून सुद्धा विकास कामे सोडून त्यांना भावी खासदार होण्याच्या स्वप्नात मग्न असताना दिसून येत आहेत.त्यांनी आपला मतदारसंघ वाऱ्यावर सोडलेले आहे असे ३० ते ४० गावातील नागरिकांचा आरोप आहे. 

         उपोषण मंडपाला राजकीय क्षेत्रातून व सत्ताधारी पक्षा कळून कुठलाच प्रतिसाद मिळत नाही असे या मतदारसंघातील लोकांचे मत आहे. येणाऱ्या काळात जो कोनी लोकसभा किंवा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असेल त्यांना पहिले या भागातील लोकांच्या व्यथा जाणून घ्यावा लागतील अन्यथा मतदार मतदान वरती बहिष्कार टाकण्याच्या मार्गावरती ठामपणे उभे राहतील या पंचक्रोशीतील लोकांच्या भावना व्यक्त होत आहेत.

***

बाक्स.‌‌.‌

    मी मतदार संघ सोडून कुठेही गेलेलो नाही काल पण २० कोटीचे भूमिपूजन केले.आज पण १० कोटीच्या विकासकामाच्या भूमिपूजन केले.मी माझ्या मतदारसंघात विकास कामे करण्याच्या मार्गावरती ठामपणे उभा आहे.

      श्री.बळवंत वानखडे 

आमदार – दर्यापूर अंजनगाव..

***

बाक्स..‌

     दिवसाढवळ्या स्वप्न पडत आहेत भावी खासदाराचे‌.विकास कामे सोडून बाहेरच्या मतदार संघात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

        खरंच यांना विकास कामे करायचे असते तर दर्यापूर दहीहांडा या रस्त्यासाठी उपोषण करताना आज रोजी उपोषण करण्याची वेळ आली नसती.

     गोपाल चंदन 

विधानसभा प्रमुख दर्यापूर 

भारतीय जनता पार्टी..