शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात मौजा शंकरपूर येथे दिनांक १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी भव्य दोन दिवसीय गुणगौरव सोहळा व समाज प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे आयोजन श्री.संताजी जगनाडे महाराज देवस्थान शंकरपूर व श्री. संताजी तेली समाज मंडळ शंकरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
संत जगनाडे महाराज यांनी विषमतावादावर प्रहार करून समतावादाचा संदेश समाजाला दिला.त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी या महोत्सवात विविध सामाजिक,धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार,दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी ग्रामसफाई व वृक्षारोपण कार्यक्रम होणार असून सायंकाळी घटस्थापना व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.रात्री संताजी भजन मंडळ शंकरपूर व इतर भजन मंडळांचे भजन कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी बुधवार,दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी ग्रामसफाई, रांगोळी सजावट व ध्वजारोहणानंतर भजन कार्यक्रम होईल. सकाळी ११ ते २ या वेळेत सप्तखंजेरी वादक,सत्यपाल महाराज यांचे शिष्य ह.भ.प. प्रदिपपाल चौधरी महाराज यांचे जाहीर सामाज प्रबोधनात्म कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी मान्यवरांचे मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विठ्ठलराव निखुले,सचिव विदर्भ एरंडेल तेली समाज हे असतील,तर उद्घाटक म्हणून प्रशांतभाऊ कामडे, अध्यक्ष विदर्भ एरंडेल तेली समाज उपस्थित राहणार आहेत.सत्कारमूर्ती म्हणून बंटीभाऊ (किर्तीकुमार) भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र हे लाभणार आहेत.
यावेळी खासदार,आमदार, प्रशासकीय अधिकारी व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी हळदीकुंकू,तिळगुळ,गोपालकाला व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण उत्सहाप्रसंगी सर्व समाजबांधव,माता-भगिनी,युवक-युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन आयोजक अशोक ज्ञानेश्वर चौधरी अध्यक्ष श्री. संताजी तेली समाज मंडळ शंकरपूर यांच्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनी,केले आहे.



