शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- काही दिवसा अगोदर पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत निष्पाप भारतीयांची निर्घूणपणे हत्या केली.त्यामुळे भारत पाकिस्तान मध्यें तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भारत सरकारने प्रत्युत्तर देण्यासाठी सिंदूर ऑपरेशन सूरु केले.युध्द परिस्थिती निर्माण झाल्यामूळे रजेवर गेलेल्या सर्व भारतीय जवानांना वापस बोलविण्यात आले आहे.
यात चिमूर तालुकातंर्गत मौजा विहिरगांव येथील भारतीय जवानाचा समावेश आहे.त्यांचे नूकतेच दिनांक ७/५/२०२५ ला लग्न समारंभ पार पडले.
काल दिनांक ११/५/२०२५ ला सिमेवर जाण्याकरीता जवान अमोल नन्नावरे हे लग्नाच्या चौथ्या दिवशी भारतीय सीमेवर जाण्यासाठी तत्परतेने निघाले.
याप्रसंगी भारतीय जवानांच्या नातेवाईकांच्या व गावातील नागरिकांच्या डोळ्यात सूख-दू:खाचे अश्रूंना साक्ष ठरवीत भारतीय जवानास औक्षवंत करुन सस्नेह निरोप दिला.
यावेळी अमोल यांनी म्हटलं की माझ्यासाठी परिवार महत्वाचा आहे.परंतु देश माझ्यासाठी प्रथमस्थानी आहे.त्यामूळे देश सेवेसाठी मी जात आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.



