उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमुर तालुकातंर्गत मौजा नेरी वरुन जवळच असलेल्या मौजा खुटाळा गाव वासीयांकडुन दर वर्षी शंकरपटाच आयोजन केले जातय.
बैलांचा शंकरपट हा शेतकऱ्यांचा एक महत्वपूर्ण उत्सवच असतोय.परंतु शंकरपटाच्या नावाखाली चालू असेला लाखोचा जुगार अनेकांना वाजविणारा होता!..
परंतु हा जुगार पटकमेटीच्या किंवा इतर कुणाच्या आशिर्वादाने चालु होता याबाबत सविस्तर माहिती अजूनही पुढे आली नाही.
खुटाळा येथील झेंडीमुंडी जुगारावर चिमुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.निशांत फुलेकर या॓नी सापळा रचुन बारीक लक्ष ठेवले व वेशा॓तर करुन काल शंकरपटात गेले.त्यांना जुगारात मोडणाऱ्या झंडी मुंडीच्या पडद्या मोठ्या प्रमाणात दिसुन आल्यात.
साहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी लगेच पिच्चर स्टाईल झंडी मुंडीच्या पडदीसह जुगार तस्करा॓ना ताब्यात घेत महाप्रसाद दीला व कायदेशीर कारवाई केली असल्याची माहिती आता लोकचर्चेचा विषय बनली.
त्यामुळे जुगार तस्कर नेमके काय करणार किंवा काय भुमिका घेणार हे पटप्रेमी अनुभवनारच आहेत.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा खुटाळा येथे शंकरपटाच्या नावाखाली चालु असलेला झेंडीमुंडीचा जुगार था॓बेल काय?पट कमेटी जुगार धारका॓ना जवळ घेईल?हा प्रश्न अनुत्तरित आहे.
काल खुटाळा येथे जुगारावर झालेल्या कारवाईमुळे पटप्रेमींमध्ये,”कही खुशी कही गम,अशा चर्चा दिसून आल्यात.



