चिमूर उपविभागीय अधिकाऱ्यांची बदली मुंबईला.. — कर्तव्यदक्ष अधिकारी जाण्याने नागरिक स्तब्ध!.. 

 

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका

     चिमूर महशुल उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांची बदली मुंबईला झाली असून ते चिमूरचा प्रभार लवकरच देणार असल्याचे पुढे आले आहे.

         प्रकाश संकपाळ हे शांत व समजदार स्वभावाचे असून ते कुशल उपविभागीय अधिकारी होते.

          चिमूर उपविभागीय क्षेत्रातंर्गत नागरिकांसी ते मैत्रीभाव पुर्वक भावनेतून वर्तणूक करीत व कायदेशीर दृष्ट्या अधिकार क्षेत्रान्वये उत्तम सहकार्य करीत.

          त्यांच्या कार्यकाळात कुठल्याही नागरिकांना त्रास झाला नाही हे विशेष.ते एक कर्तव्य दक्ष अधिकारी होते.

       शांत,समजदार,कर्तव्यदक्ष अधिकारी जाण्याने नागरिक स्तब्ध झाले आहेत.