आयुर्विमा क्षेत्रात पुजा कुरंजेकर समूहाची साकोली शाखेत उल्लेखनीय कामगिरी….

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

     साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे सी एल आय ए ग्रुप मध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षात आयुर्विमा पॉलिसी बिग्रेडची नुकतीच स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा विशेष करून पॉलिसी लाईव्ह व प्रीमियम वर आधारित असल्यामुळे या स्पर्धेचे महत्व अधिक आले होते व या स्पर्धेत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखेतील पुजा नरेश कुरंजेकर यांच्या समुहाने उल्लेखनीय कामगिरी करीत मानाचा तुरा रोवला हे विशेष.

         साकोली शाखेतील सर्व सी एल आय ए ग्रुपचे ग्रुप लीडर व त्यांच्या अभिकर्त्यांनचे या स्पर्धेत वर्चस्व पणाला लागले होते. यामध्ये साकोली शाखेतील पुजा कुरंजेकर यांच्या समूहाने अतिशय उल्लेखनीय कार्य करीत ७८६ पॉलिसी संख्या मध्ये ७५० पॉलिसी लाईव्ह पुर्ण करीत जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण क्षेत्रातील महिला पुरुष व कुटूंबीयांचा आयुर्विमा करीत त्यांना पुढील भविष्याची जमापुंजी आयुर्विमा हेच मिशन आहे हे सिद्ध करून दाखविले. साकोली शाखेत सी एल आय ए मध्ये पुजा कुरंजेकर फक्त ३८ अभिकर्त्यांच्या समूहातील आधारावर २०२२-२३ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकाला फक्त ८८ पॉलिसी लाईव्ह जास्त आहेत, परंतु यामध्ये त्यांचे ५९ सक्रिय अभिकर्ता साकोली विभागात कार्यरत आहेत. जर साकोली शाखेत सी एल आय ए ग्रुप चे एकुण लक्षवेधक वाटचाल व उत्तुंग शिखरकार्य पाहता पुजा कुरंजेकर समुहाने २०२२-२३ मध्ये आपल्या सी एल आय ए समुहाच्या वर्चस्वाची ही लढाई जिंकली आहे. यामध्ये समुहामधील सर्वच अभिकर्त्यांनी आपली कार्यकुशलता दाखवित उत्तम व दमदार कामगिरी दाखवित हे यशस्वीपणे करून दाखविले आहे. यामध्ये विशेषतः चार अभिकर्त्यांनी शतक पूर्ण केले त्यामध्ये अर्चना उके, रोशन कापगते, नरेश कुरंजेकर व प्रमोद गजभिये यांचा समावेश आहे. प्रमोद ठाकरे व दिव्या निंबेकर यांनी देखील अर्धशतक पूर्ण केले असून समुहामधील सर्व अभिकर्त्यांच्या सहयोगामुळेच पुजा कुरंजेकर यांचा २०२२-२३ या आर्थिक वर्षात हिरक ब्रिगेड मध्ये समावेश झाला. पुजा कुरंजेकर ने आपल्या यशाचे श्रेय सर्व ग्रुप अभिकर्त्यांना तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळ साकोली शाखेतील सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार व सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांना दिले आहे. नागपूर विभागीय सी एल आय ए मॅनेजर लटारे यांना देखील आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. तसेच पुजा कुरंजेकर यांनी खास करून एल आय सी मिशन समुहामधील आपल्या अभिकर्त्यांचा उत्साह वाढविण्यात व त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करणाऱ्या चंदु लिखार यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे.