पाली उमरी येथे विश्वदया मल्टीपरपस सोसायटीच्या सभागृहात महीला जनजागृती मेळावा संपन्न.

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवनी

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील पाली ( उमरी) या गावात विशवोदया मल्टीपरस सोशल सर्विस सोसायटी आणि पाली( उमरी)ग्राम पंचायत सरपंच शुभन राऊत यांच्या संयुक्त विदयमानाने सोमवार ११तारखे ला दुपारी महीला मेळावा व महीला जागृतीचा हेतु ठेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

           कार्यक्रमचा प्रस्ताविक विश्वोदया मल्टीपरपस सोसायटीचे प्रमुख सिस्टर दया मैंडम यांनी आपले प्रास्ताविक भाषणात सांगीतले की विश्वोदया सोसायटी तर्फे महीलाना जागृती आणुन स्वमं रोजगार करीता संस्था मार्फत सिलाई प्रशिक्षण ब्युटीपार्लर व या महिलाचे विविध् छंद व विविध स्पर्धेचे आयोजन मागील अनेक वर्षा पासुन कार्य करण्यात येत आहे.

         कार्यक्रमाचे संचालन ग्राम पंचायतची उपसरपंच निकिता खोब्रागडे यानी केले.  तसेच महीला जनजागृती मेळावा कार्यक्रमात महीला साठी विविध् स्पर्धा घेण्यात आले व विजेता महिलाना बक्षिस वितरण करण्यात आले. आणी उत्कृष्ठ कार्यकरणारी महीला चे सत्कार करण्यात आले.

           कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख अतिथि ग्रामपंचायत पाली उमरी चे सरपच शुभम दत्ताजी राऊत यांनी कार्यक्रमा चे अध्यक्षीय भाषणात म्हटले की महीलानी बचत बचत गट तयार करून आपली जिवीका चालवुन आत्मनिर्भर व्हावे.

          कार्यकमात उपसरपंच सौ निकिता खोब्ररागडे , गावातील पोलीस पाटील प्रल्हाद उरकुंडे (उमरी ),पोलिस  पाटील मनोज प्रधान (पाली),पंचायत समितीचे कृषी अधिकारी चंद्रकांत देशमुख, बचत गटाचे अधिकारी संदेश लामसागे सर व विश्वोदया मल्टीपरपस सोसायटीचे प्रमुख सिस्टर दया मँडम , सिस्टर अश्रिता मंडम यानी महीलाना मोलाचे मार्गदर्शन करित शासनाचे योजनाचा लाभ ध्यावे.

          कार्यक्रमात ईश्वर देवढगले, भुपेंद्र खोब्ररागडे, सुरेश केवट, निखिलेश उरकुंडे, माधुरी मेश्राम,रंजनी राऊत, रूपाली प्रधान,राखी शेंदरे,सुषमा खोब्ररागडे,शारदा भोयर व गट ग्रा.प.उमरी (पाली) च्या महिला बचत गटाची महीला पदाधिकारी सभासद व पाली उमरी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

            शेवटी विश्वोदया मल्टीपरपस सोसायटीची सिस्टर अश्विता मेंड्म यांनी सर्व उपस्थित पाहुणे व बचत गटातील महीला व गावाकरीचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचे समारोपची घोषणा केली.