राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते टणु येथील चार कोटी रुपये किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न… — येणाऱ्या लोकसभेसाठी उप मुख्यमंत्री अजित पवार जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला निवडून देण्यासाठी साथ द्यावी :- विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            टणु तालुका इंदापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून टणु येथील रिंग रोड रस्ता डांबरीकरण कामासाठी चार कोटी रुपयाचा निधी मंजूर कामाचे भूमिपूजन समारंभ माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा सरचिटणीस आण्णासाहेब कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, माजी संचालक महादेव घाडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील या सर्वांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.

          भूमिपूजन प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे बोलत आसताना म्हणाले की टणु येतील माजी सरपंच सोमनाथ मोहिते सहित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी माझी घोड्यावर बसून मिरवणूक काढली याचा कधीच विसर पडू देणार नाही. भर्तरीनाथ बाबांचा आशीर्वाद घेऊन मी नतमस्तक झालो नाथबाबांच्या किचन रूम साठी 20 लाख रुपये निधी मंजूर करीत आहे. ज्या मागण्या इतर कामासाठी गावच्या वतीने माजी सरपंच सोमनाथ मोहिते यांनी मागितल्या त्याही लवकरच मंजूर करून कामे मार्गी लावू जिम खेळण्यासाठी लागणारे सर्व साहित्य लगेच देण्यासाठी सांगितले आहे. तेही टणू येथील ग्रामस्थांना मिळेलच माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी उदगार.

          या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, आण्णासाहेब कोकाटे, महादेव घाडगे, प्रशांत पाटील, शुभम निंबाळकर, दत्तामामा घोगरे, सचिन सपकाळ ,तसेच पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी सराटी, बावडा, गोंदी, ओझरे, लुुमेवाडी, गिरवी, नरसिंहपुर, टणु , आदी गावातून अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          कार्यक्रमाची प्रस्तावना माजी सरपंच सोमनाथ मोहिते यांनी केली. या प्रसंगी श्रीमंत ढोले, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, संचालक श्रीकांत बोडके, अगंद जगताप, संभाजी मोहिते, आदी मान्यवरांनी या वेळी आपले विचार मांडले चार कोटी एवढा मोठा निधी कधीच टणु गावाला मिळालेला नव्हता आत्ता दत्तात्रय भरणे यांनी रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी निधी दिल्याबद्दल टणु गावच्या वतीने त्यांचे कौतुक करून हलग्यांचा व फटाक्यांचा आवाजा सहित घोड्यावर बसुन मिरवणूक काढण्यात आली. तर टणु ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व फेटा बांधून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

 भुमिपुजन प्रसंगी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना टणु ग्रामस्थांच्या वतीने महाभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

चौकट :-

टणु येथील विनोदजी मोहिते यांची अजित पवार गट तालुका सर चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल निवडीचे पत्र विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते यावेळी देण्यात आले.