ब्रेकिंग न्यूज… — रोडवरील खड्डयामुळे दुचाकीचा अपघात… — चालक गंभीर जखमी… — रामगाव फाट्याजवळील घटना..

युवराज डोंगरे/खल्लार 

    उपसंपादक

            दर्यापूर खल्लार रोडवर पडलेल्या खड्डयामुळे दुचाकीचा अपघात झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली असून अपघातातील दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे.

              नितीन शिंगणे रा. खैरी(दोनोडा)असे जखमीचे नाव असून दर्यापूर खल्लार रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत.मात्र पडलेल्या या खड्डयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्षच नाही.

         जखमीस शैलेश मेटकर, अंकुश रहाटे,गोपाल वसु, मनोज वसु, प्रतिक खांडेकर, दिप खांडेकर यांनी रुग्णवाहिकेद्वारा उपजिल्हारुग्णालय,दर्यापूर येथे उपचारासाठी नेले प्रकृती गंभीर असल्याने जखमीस अमरावती येथे हलविण्यात आले.