भाजप आध्यात्मिक आघाडीच्या प.महाराष्ट्र अध्यक्षपदी संजय महाराज घुंडरे यांची फेर नियुक्ती…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच घोषणा केली आहे. यामध्ये भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी आळंदी येथील हभप संजय महाराज घुंडरे पाटील यांची फेर नियुक्ती करण्यात आली आहे.

        संजय महाराज घुंडरे पाटील हे आळंदीतील भाजपचे ज्येष्ठ नेते असून, भाजप संघटनेत त्यांनी अनेक पदांवर काम केले असून वारकरी संप्रदायाशी असलेली नाळ आणि अभ्यास लक्षात घेता त्यांची भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदी फेर नियुक्ती करण्यात आली असल्याचे आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले.

       घुंडरे पाटील यांची फेर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आळंदी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष किरण येळवंडे, पांडुरंग वाहिले, सागर भोसले, ॲड.सचिन काळे, सुनीता रंधवे, रुक्मिणी कांबळे, ज्ञानेश्वर बनसोडे, प्रमोद बाफना, वासुदेव तुर्की, मंगलाताई हुंडारे, चारुदत्त प्रसादे, राजेश वहिले, विशाल भागवत तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.