“पैसा खातो चिवडा वाटतो,असा चिमूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार,:- डॉ.सतिष वारजूकर.. — शेतकरी मोर्चा प्रसंगी आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडियांचा घेतला विविध समस्यातंर्गत खरपूस समाचार… — आमदारांच्या भगव्या टोपीआड चाललं तरी काय? — शेतकऱ्यांकडे व बेरोजगारांकडे लक्ष द्यायला वेळ नाही असा आमदार कोणत्या कामाचा? गंभीर प्रश्न..

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक 

         चिमूर तालुक्यातील शेतकरी व बेरोजगार विविध प्रकारे समस्याग्रस्त असतांना,आमदार बंटी भांगडिया हे पैसा खाण्यात व चिवडा वाटण्यात व्यस्त झाले असून,”भ्रष्ट आमदार शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या बाबतीत चूप राहण्यातच दंग आहेत अशा शब्दात डॉ.सतिश वारजूकरांनी,”चिमूर आमदारांचा खरपूस समाचार घेत विविध मुद्यांवर स्पष्टता उघड केली.

          प्रसंग होता १० नोव्हेंबरला चिमूर येथे झालेल्या शेतकरी मोर्चातंर्गत उपस्थित असलेल्या शेतकरी व इतर बांधवांना मार्गदर्शन करणारा..

***

शेतकरी बांधवांना नाहक त्रास दिला जातो…

              चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विरोधी पक्षनेते डॉ.सतिश वारजूकर यांनी मोर्चेकरांना मार्गदर्शन करताना सांगितले की,मागील १० वर्षांपासून शेतकऱ्यांना विज कनेक्शन दिले जात नाही,उलट शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जातो आहे.शेतकऱ्यांचा शेतमाल जंगली प्राणी उध्वस्त करीत असतांना त्यांना वनविभागाच्या वतीने योग्य आर्थिक मदत दिली जात नाही.हे दोन्ही गंभीर व संवेदनशील मुद्दे शेतकऱ्यांसी निगडित असल्याने या मुद्यावर स्थानिक आमदार चूप कसे काय बसले आहेत?हा डाॅ.सतिश वारजूकरांचा सवाल अतिशय मार्मिक व तितकाच पोटतिडकीचा आहे.

***

बेरोजगारांना रोजगार नाही?

                 तद्वतच त्यांनी बेरोजगारांचा प्रश्न उपस्थित करीत,” आमदार त्यांच्या ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष करतात?,हा मुद्दा सुध्दा त्यांचा अतिशय महत्त्वाचा आहे.मात्र,भाजपा पक्षाचे धोरण खाजगीकरणातंर्गत बेरोजगारी वाढवणे व नागरिकांना लाचार करणे,कमजोर करणे असे असल्याने आमदार बंटी भांगडिया बेरोजगारांच्या समस्यांवर कधीच बोलणार नाही हे सुध्दा तेवढेच सत्य आहे.आणि बोलले तरी ते बेरोजगारांना कायम रोजगार देऊ शकत नाही हेही तेवढेच खरे आहे.

***

खरपूस समाचार…

          आमदार बंटी भांगडियांचा खरपूस समाचार घेताना डॉ.सतिश वारजूकर म्हणाले की,”आमदार पैसा खातो चिवडा वाटतो,”आमदार पैसा खातो दहिहंडी करतो,”आमदार पैसा खातो दांडिया खेळतो,तद्वतच आमदारांनी बालाजी सागरच्या व स्टेडियमच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार केला असून,बालाजी सागरचे सौंदर्यीकरण अजून पर्यंत झाले नाही आणि स्टेडियमचे काम सुध्दा पुर्ण केले नाही.

      मग,आमदार बंटी भांगडिया करतात तरी काय?असा गंभीर मुद्दा उपस्थित करून त्यांनी आमदारांच्या विकासाची पोलखोल केली.

***

चिमूरच्या नागरिकांना पाणी मिळत नाही,रस्ते दुर्लभ..

            याचबरोबर चिमूरच्या नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही, चिमूरच्या नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते,चिमूरात दळणवळण करण्यासाठी योग्य रस्ते नाहीत,असे असताना आमदार बंटी भांगडिया शांत कसे?हा मुद्दा सुध्दा त्यांचा तितकाच महत्त्वाचा आहे.

***

दारुची व बियर बारची दुकाने…

            आमदार बंटी भांगडिया यांनी चिमूरला दारुमय बनविले असून चिमूरात ३ देशी दारूचे नवीन दुकाने लावू दिलीत व २२ बियर बारची शापी सुरु केल्यात.हाच तो चिमूरचा असल्ल विकास आहे काय?असा प्रश्न उपस्थित करीत आमदारांच्या भगव्या टोपीआड चालल तरी काय? याबाबत त्यांनी सखोलता निर्माण केली.

          आमदार बंटी भांगडिया हे चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत प्रथमतः निवडून आले,तेव्हा चिमूर तालुक्यात अवैध व्यवसायसायाला व मद्य व्यवसायाला थारा नसणार असे अनेकदा बोलले होते.

        मात्र,चिमूर तालुक्यात अवैध व्यवसायसाय बघता व मद्य व्यवसाय बघता आमदार बंटी भांगडिया बोलल्या प्रमाणे कृती करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेला चिमूर तालुका प्रचंड प्रमाणात व्यसनाधीनतेत अडकलाय यासारखे दुर्दैव कोणते असेल.

***

अवैध उत्खनन आमदारांचे मानसच करतात?…

            डॉ.सतिश वारजूकर यांनी अवैध उत्खननावर भाष्य करताना सांगितले की आमदारांचे मानसच (कार्यकर्ते) रेतीचे व मुरुमाचे अवैध उत्खनन रात्रंदिवस करतात.

           मग? चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणारे अवैध उत्खनन आमदार बंटी भांगडियांच्या आशिर्वादाने होत आहेत काय? आणि यामुळेच अवैध रेती व मुरुम उत्खननाला स्थानिक अधिकारी डोळेझाकून पाठबळ देत आहेत काय?हा गंभीर मुद्दा चोरीचा व लुटीचाच आहे.यामुळे महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाने अवैध उत्खननावर चौकशी बसवली पाहिजे व अवैध उत्खननाची सखोल चौकशी केली पाहिजे.संबंधित सर्वांवर कारवाई केली पाहिजे आणि चोर व लुटेरे कोण आहेत हे जनते समोर आले पाहिजे.

***

           एकंदरीत डॉ.सतिश वारजूकरांनी मोर्चेकरांना मार्गदर्शन करताना विविध अशा ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधत अधिकाऱ्यांची व आमदारांची झोप उडवून दिली आहे.

          याचबरोबर शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या बाबतीत वर्तनूक सुधारली गेली नाही तर शेतकऱ्यांच्या,बेरोजगारांच्या व नागरिकांच्या सर्व समस्यांची प्रकरणे अंगलट येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी सोडले आहे.