प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल ताटे, व्हा. चेअरमनपदी सुषमा सुतार…

  बाळासाहेब सुतार

निरा नरशिंहपुर प्रतिनिधी 

       मंगळवेढा तालुका

          प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सत्तारुढ तालुका परिवारातील शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव ताटे यांची तर व्हाईस चेअरमनपदी शिक्षक समितीच्या महिला आघाडी अध्यक्षा सुषमा सुतार यांची अविरोध निवड करण्यात आली.

           मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक शिक्षकांची जिव्हाळ्याची संस्था म्हणून ३६ वर्षापासून या शिक्षक पतसंस्थेचा लौकिक आसून ८.४० रु. एवढया अल्प व्याजदराने पतपुरवठा करुन संस्थेने शिक्षकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे. स्व.महादेव सोमगोंडे, मनोहर कलुबर्मे यांनी १९८७ साली या संस्थेची मुहुर्तमेढ रोवली आसून शिक्षकांसाठी आनेक विविध योजना राबवून सभासदांचा विश्वास कमावला आहे. स्वभांडवली या संस्थेने सभासद हिताच्या आनेक योजना राबवून सभासदांना न्याय दिला आहे.

             नुकत्याच झालेल्या शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूकीत सुरेश पवार, पंडीत कोरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक समिती पुरस्कृत तालुका परिवार पॅनलने संजय चेळेकर, श्रीमंत पाटील, शाम सरगर यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक संघ व आदर्श शिक्षक समितीच्या गुरुसेवा पॅनलचा पराभव करीत बहुमत मिळविले होते. संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.

           यामध्ये कामाचा माणूस म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलराव ताटे व सुषमा सुतार यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. लिंबोळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नूतन संचालक धनंजय पाटील, निवृत्ती सुर्यवंशी, निंगप्पा बिराजदार, अनिल दत्तू, नंदा टेळे इत्यादी संचालक उपस्थित होते.

           यावेळी ज्येष्ठ नेते मनोहर कलुबर्मे, शिक्षक समितीचे राज्य नेते सुरेश पवार, शिक्षक नेते पंडीत कोरे, विश्वनाथ वाघमारे, सिद्धेश्वर धसाडे, भगवान चौगुले, ज्ञानेश्वर चव्हाण, चंद्रकांत पवार, धनंजय लेंडवे, सुर्यकांत जाधव, संतू लाड, विश्वास आवताडे, ज्ञानेश्वर घोडके, काकासो चव्हाण, राजेंद्र कांबळे, उमाजी कांबळे, शिवाजी शिलेदार, विरेंद्र राक्षे, सुभाष कांबळे, नाथाजी कांबळे, अशोक कोळी, अमित भोरकडे, धनंजय लेंडवे, महिपती अनुसे, गजानन लिगाडे, युवराज कदम, विलास मासाळ, रमेश भजनावळे, सिध्देश्वर भगरे, नवनाथ सपताळे, पांडुरंग शिंदे, मारुती मेटकरी, छत्रुघ्न माळी, श्रीरंग आवळेकर यांच्यासह तालुका परिवाराचे पदाधिकाकारी उपस्थित होते. यावेळी तालुका परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.