व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने धरणे आंदोलन संपन्न…  — मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत दिले निवेदन…

प्रमोद राऊत / तालुका प्रतिनिधी 

       माध्यमांकडे लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणुन पाहीले जाते. मात्र माध्यमकतीच्या प्रश्नाच्या सोडणुकीच्या दृष्टीने शासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. याचा आम्हाला खेद आहे. आम्ही व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून आज लक्ष वेधत आंदोलन करण्यात आले आहे. त्यासाठी काही मागण्या करण्यात आले. 1) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावे. २) पत्रकारिकेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्विकृती पत्रिका देण्यात यावी. ३) वृत्तपत्रांना सध्या जाहीरातीवर लागू असलेला जिएसटी रद्द करावा. ४) पत्रकारांच्या घरासाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. ५) कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देवुन त्यानुसार मय्यत पत्रकारांच्या कुटुंबाचे पुर्नवसन करावे. ६) शासनाचे सध्याचे जाहीरात धोरण “क” वर्ग दैनिके (लघु दैनिक) चंना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब) वर्ग दैनिका इतक्याच जाहीराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहीराती द्याव्यात. 

          वृत्तपत्रे व पत्रकारांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले असून चिमूर तहसील कार्यालय समोर व्हॉईस ऑफ मीडिया तालुका चिमूर च्या वतीने धरणे आंदोलन करून मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत निवेदन देण्यात आले.

             निवेदन देत असताना व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हा सदस्य विलास कोराम, जिल्हा सरचिटणीस बालु सातपुते, जिल्हा सदस्य प्रमोद राऊत, चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके, तालुका सचिव भरत बंडे, योगेश सहारे, उमेश शंभरकर, फिरोज पठाण, जावेद पठाण, सुनील हिंगणकर आदी उपस्थित होते.