सर्व समाज मनात घर करण्यात यशस्वी होणार..:- समाजसेवक दिवाकर निकुरे  — प्रतिस्पर्ध्यांना उघडे करणार,चिमूर विधानसभाही जिंकणार..चर्चेतील स्पष्टता..

 

 प्रदीप रामटेके

मुख्य संपादक 

         ग्रामीण भागातील असल्याने खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या व शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील वास्तव माहिती आहे.त्यांच्या समस्यांचे बारकावे अवगत असल्याने त्यांच्या हितासाठी व त्यांच्या उन्नतीसंबंधाने संघर्ष करणे माझे नैतिक कर्तव्य आहे.

        तद्वतच जबाबदारी अन्वये दक्ष कर्तव्यातंर्गत वेळोवेळी सतर्क होत,सर्व समाज घटकातील नागरिकांच्या हितासाठी तत्परतेने कार्य करीत राहणार व सर्व समाज घटकातील नागरिकांच्या मनात घर करणार असे स्पष्ट करीत समाजसेवक दिवाकर निकुरे यांनी आपले कार्ये खुली केली.

          दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांनी त्यांच्या सोबत अनेक मुद्द्यांवर आज चर्चा केली.या चर्चेत त्यांनी राजकीय व सामाजिक स्थित्यंतरे उकल करीत चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत विजय गणिताची मांडणी केली.आणि चर्चा अंतर्गत त्यांनी विश्वासपुर्वक सांगितले की सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हमखास विजय आमचाच असेल.

          याचबरोबर स्वपक्षीय व विरोधी पक्षीय,” विरोधकांच्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची, पुराव्यानिशी कुंडली माझ्याकडे असल्यामुळे विधानसभा निवडणूक वेळीच्या रणांगणात सार्वजनिक करु व त्यांचे खरे रुप जनते समोर आणू असेही ते म्हणाले.

        सामाजिक व राजकीय क्षेत्रातील बारकावे माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना सखोलपणे माहिती असल्यामुळे त्यांच्या त्या बारकाव्यांचा सदोपयोग विजयी उमेदवारांच्या साक्षीने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला होईल,असे सुध्दा त्यांनी सांगितले.

        माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार हे त्यांचे सामाजिक व राजकीय गुरू असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर विधानसभा मतदारसंघांतर्गत पक्ष बांधणीला त्यांनी सुरुवात केली आहे.

         समाजसेवक दिवाकर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत नागभिड तालुक्यातील मौजा हुमा मांगरुड या गावचे रहिवासी आहेत.

         त्यांच्या बोलण्यात असलेला दम हा त्यांचा कार्यातून वारंवार प्रकट झाल्यास ते चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील भावी आमदार असतील?