रविवारी वेदश्री तपोवन येथे भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्र, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी स्वामी यांच्या शुभ आशीर्वादाने येत्या रविवार दिनांक 14 मे रोजी सकाळी नऊ ते पाच या दरम्यान येथील वेदश्री तपोवन मोशी आळंदी रोड हवालदार वस्ती (डुडूळगाव) येथे भव्य रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

         रक्तदान शिबिराचे हे दुसरे वर्ष असून,गतवर्षी रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. त्यामुळे यंदाही रक्तदान शिबिर व इतर मोफत विविध आरोग्य तपासण्या करून, रक्तदात्यांना आकर्षक अशा भेटवस्तू देऊन तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

          मोफत नेत्र तपासणी साठी सूर्या ऑप्टिकल्स डॉ.सुशांत त्रिवेदी, मोफत आरोग्य तपासणी कमलेश हॉस्पिटल, जगताप क्लिनिक, चव्हाण हॉस्पिटल, स्त्री रोग तज्ञ धारा हॉस्पिटल व मोफत नेत्र तपासणी असे संपूर्ण दिवसभर विविध विषय घेऊन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी मोशी आळंदी व परिसरातील लाभार्थींनी अवश्य याचा लाभ घ्यावा असे जाहीर आव्हान करण्यात आले आहे. सदरील शिबिरासाठी आळंदीसह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.