मालेवाडा क्षेत्रात विजेचा लपंडाव सुरूच… — भाजपा महामंत्री डॉ.मनोहर आत्राम यांची तोडगा काढण्यासाठी आमदारांना विनंती…

ऋषी सहारे

  संपादक

        आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाने कृषी पंपाना वीज 12 तास पूर्ववत मिडणार असे वाटत होते. पण मालेवाडा परिसरात परिस्थिती जैसे थे आहे उलट अजून कुरखेडा क्षेत्रातील चार गाव मालेवाडा फिडर ला जोडल्याने उलट लोड शेडिंग च्या वेडे व्यतिरिक्त अजून लाईनीचे जाणे येणे सुरूच असते.

           मालेवाडा विभागामध्ये जवड पास छोटी मोठी 61 गावे येतात प्रत्येक इथला माणूस शेतीवर अवलंबून आहे या क्षेत्रात मका,धान मिर्ची चे पीक बऱ्या पैकी संपून क्षेत्रात लावलेले आहे.एमएसइबी चे वरिष्ठ व कर्मचाऱ्यांना फोन लावले असता ते उडवाउडवीची उत्तर देतात.

            इतकी मेहनत करून जे पीक लावले आहे ते पाण्या अभावी होरपडत आहे आणि शेतकरी इकडे तिकडे विचारणा करून काही करता येऊ शकत का म्हणूंन केविलवाणा होऊन उभं पीक मरताना पाहात आहे.10 वी 12वी चे पेपर सुरू असताना रात्रोचे वेडी सुद्धा तीन तीन वेळा रात्रौ लोड शेडींग घेतली जात आहे. परिसरातील सर्व जनतेची केविलवाणी विनंती आहे की यावर लोक प्रतिनिधींनी राजकारण न करता काही तरी तोडगा काढावा.