जी सी पाटील मुनघाटे महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शनी…

 भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

         श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित श्री जेएसपीएम महाविद्यालय धानोरा येथे अरण्यदीप वार्षिक युवा सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात ग्रंथालय विभागाद्वारा ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

         ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चव्हाण यांनी केले ग्रंथ प्रदर्शनीचे विविध मध्ये विषयावरील दर्जेदार पुस्तके ठेवण्यात आली होती.

             त्यामध्ये संदर्भ ग्रंथ कथा कादंबरी विविध विषयावरील एनसायक्लोपीडिया डिक्शनरी अशा अनेक पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले.

              महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी ग्रंथ प्रदर्शनीचा आस्वाद घेतला ग्रंथ प्रदर्शनी यशस्वी करण्याकरता महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गोहणे आणि ग्रंथालय परिचर श्रीमती छाया चंदेल यांनी परिश्रम घेतले.