Home Social महाराष्ट्र विद्यालय वैरागडच्या दोन विद्यार्थिनींची पोलीस दलात निवड; शाळेतर्फे जंगी सत्कार…

महाराष्ट्र विद्यालय वैरागडच्या दोन विद्यार्थिनींची पोलीस दलात निवड; शाळेतर्फे जंगी सत्कार…

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी – महाराष्ट्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वैरागड येथील दोन विद्यार्थिनींनी आपल्या यशाची मोहोर उमटवत पोलीस विभाग, गडचिरोली येथे निवड सार्थकी लावली आहे. कु.कांचन अमोद डबले आणि कु. जानवी विलास भैसारे अशी या यशस्वी विद्यार्थिनींची नावे असून, त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल शाळेच्या वतीने आज, शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

          ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात प्रवेश मिळवल्याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. डी. उंदिरवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

        या सोहळ्याला संस्थेचे सदस्य पी. एन. कऱ्हाडे, एन. एन. कऱ्हाडे, पी. एन. कऱ्हाडे तसेच अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून या विद्यार्थिनींच्या कष्टाचे कौतुक केले आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती:

          सत्कार समारंभाला विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये एस. एम. पटले, आर. एस. कुंभारे, कु. व्हि. एम. वैरागडे, व्हि. एम. चटकी, कु. एल. आर. मोटघरे, आर. एम. मारभते, जी. एम. वलके, आर. एन. धोबे, एम. बी. नाहमुरते, कु. एस. पी. काटवे यांचा समावेश होता. तसेच कु. साक्षी डांगे, अंकित घुबडे, आचल पगाडे, रोहिणी बारस्कर व इतर विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या सखींच्या यशाचा आनंद साजरा केला.

        या यशामुळे महाराष्ट्र विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पोलीस दलात निवड झालेल्या दोन्ही कन्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.